आज संध्याकाळी फिरताना
पाहिले मी एका जोडप्याला ,
वयाची पन्नाशी ओलांडली
तरी अंत नव्हता त्यांच्या प्रेमाला ,

तळ्याच्या काठावर बसुनी
मन मोकले करत होती ,
खर तर त्या गप्पांमधुनी
एकमेकाना सावरत होती ,

आयुष्याच्या घालवलेल्या
क्षणांना आठवून हसत होती ,
खर सांगू का…
ती आजी अजुन ही
आजोबांना बघून लाजत होती ,

आजीला पाहून आजोबांनी
तिला मोगरयाचा गजरा भेट दिला ,
तळ्याच्या त्या काठावर बसून
एक ice-cream चा कोन
दोघांनी मिळून खाल्ला ,

प्रेमाच्या रंगात रंगताना
आजीच्या डोळ्यातून पाणी आले ,
अन तिने आजोबांचा हात हाती घेवुन
सात जन्माचे वचन पुन्हा मागितले ,

खर तर ती संध्याकाळ
माझ्यासाठी अविस्मरनीय होती ,
प्रेमाचे अजुन एक रूप
पाहण्याची मिळालेली अनमोल संधी होती ……..

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top