Full……….. time passss……..   

फोनची बेल वाजते. (तो चुकीचा क्रमांक लागलेला असतो.)
पहिला(फोन करणारा पुणेरी) : हेलौ..
दुसरा : बोला..
पहिला : देशपांडे आहेत का ?
दुसरा(चिडून) : नाही, ते 'पावन खिंडीत' लढतायेत!
पहिला : मग त्यांना सांगा राजे गडावर पोचले. आता मेलात तरी चालेल.
(फोन बंद)

हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा..हाहाहाहा

*********************************************************************************************

MARATHI FUNNY QUESTION & ANSWER
प्रश्नः (दहावी पेपर)- कारणे द्या; गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते, म्हणून.

प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात (३-४ ओळीत) माहिती लिहा.
उत्तर - संत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते. लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत.
------------------------------

प्रश्न - कारणे द्या. उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.

खालील बाबतीत काय होईल ते सांगा-
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास----
उत्तर- ग्लास काळा होईल.

मराठीत भाषांतर करा.

चिडियां पेडपर चहचहाती हैं ।
चिमण्या झाडावर चहा पितात

*********************************************************************************************

हिंदी लोकांची मराठी :
or
मराठी लोकांची हिंदी:
पहलि बार पोहने गया तो क्या हुआ मालुम?
पहिले पानी मे शिरा, फिर पोहा और बाद मे बुडा!!
घाई करो भैया नही तो बस जायेगी, और हमारी पंचाईत होयेगी!!
सरबत मे लिंबु पिळा क्या!!
इतना महाग कैसे रे तेरे यहा, वो कोपरेका भैया तो स्वस्त देता है!!
कंदा काट के, चिर के मस्त ओम्लेट बनाने का और उपर से थोडा कोथिंबिर भुरभुरानेका!!
अरे बाबा गाडी सावली मे लगा!!
ए भाय, मेदुवडा शेपरेट ला, साम्बार मे बूडा के मत लाना!!
केस एकदम बारीक कापो भैया!!
खाओ पोटभर खाओ लाजो मत!!
धावते धावते गिर्‍या तो काडकन हात का हाड मोड्या!!

*********************************************************************************************

मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत
द्त्तो वामन पोतदार पुणें विद्यापीठांचे कुलगुरु असताना दिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले...
'मेरीट लिस्ट बघीतल्यावर अस दिसतय कि या वेळी मेरीट मघे येणा~या मुलींचि संख्या मुलांपेक्षा खुपच जास्त आहे.म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत.
अस म्ह्टल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला..
द्त्तो वामन पुढें म्हणाले..पण मुलांनी नाराज व्हायच कारण नाही.. कारण या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत..

*********************************************************************************************

वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना, काय उदगार काढतील..?


पायलटची बायको ... " गेलास उडत..."
मंत्र्याची बायको ... "पुरे झाकी तुमची आश्वासनं."
शिक्षकाची बायको ..."मला नका शिकवू..."
रंगारयाची बायको ...."थोबाड रंगवीन."
धोब्याची बायको ... " चांगली धुलाइ करीन."
सुताराची बायको ... "ठोकुन सरळ करीन."
तेल विक्रेत्याची बायको ..." गेलात तेल लावत."
न्हाव्याची बायको ... "केसाने गळा काप्लात की हो माझा."
डेंटिसची बायको ... "दात तोडुन हातात देइन."
शिंप्याची बायको ..."मल शिवलंस तर याद राख."
अभिनेत्याची बायको ..."कशाला नाटक करता?"
वाण्याची बायको ... "नुसत्या पुड्या सोडु नका."

*********************************************************************************************

स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते.
कसे ????
असे कसे विचारता ????

कसे ते पाहा.

एकदा एक बायको संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही.
दुसऱ्या दिवशी नवरा विचारतो तेव्हा ती सांगते "अरे, मी एका मैत्रिणीच्या घरी राहिले होते"

नवऱ्याचा तिच्या शब्दांवर विश्वास बसत नाही.
तो तिच्या सर्वात जवळच्या 20 मैत्रिणींना फोन करतो.

ती काल आपल्याकडे आली नव्हती, असंच 20 ही जणी सांगतात.

after 10 days..........

आता जेव्हा नवरा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही तेव्हा काय होते पाहा.
दुसऱ्या दिवशी सकाळी बायको विचारते.

तेव्हा तो सांगतो "अगं मी माझ्या एका मित्राच्या घरी राहिलो होतो"

बायकोचा नवऱ्यावर विश्वास बसत नाही.
ती त्याच्या सर्वात जवळच्या 20 मित्रांना फोन करते.

त्यांतले 10 जण छातीठोकपणे सांगतात की काल रात्री तो त्यांच्याच घरी होता.

and and and

उरलेले 10 जण तर तो आत्ताही आपल्या घरातच आहे असंही सांगून टाकतात

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top