आयटीतले जोडपे नवरा बायको ( किंवा जे काही रिलेशन असेल ते ) अशी जोडपी संगणकमय होऊन गेलेली दिसतात. चोवीस तास एकच क्षेत्र....जेवणखाण, भाजी आणणे, बाजारहाट या प्रापंचिक जबाबदा-या म्हणजे त्यांना कटकट वाटते....खरंच यांच कसं होत असेल......?
आयटीतले जोडपे
अजून झोपून राहिलास तर रेड स्माईली देईन
मला पाहून हासलास तर छान रिप्लाय देईन
लोल लोल लोल लोल .उठतोय मी आता बोल
बॅड बॅड बॅड सर्वर सारखी फिरतेहेस का गोल ?
सकाळी सकाळी गॅसचे कनेक्शन डाऊन झालेय
सिलेंडर आडवे केले तरी मोडेम बाद झालेय
थांब थांब प्रिये आता, लागलीच मी निघतो
नंबर ही लावतो आणि कॅफेत जाऊन जेवतो
वा रे शहाण्या कसला आहेस, स्वतःपुरता बघतोस
नेहमी नेहमी स्वतःचीच मेमरी फुल्ल करतोस
तुझी डिस्क बाद झालीये, नेहमी असं बरं नाही
आज गॅस संपला उद्या, काही काही खरं नाही
अरे एक एरर आली म्हणून इतका कसा चिडतोस
सिन्टॅक्स एखाद चुकलं म्हणून नेटवर्कच तोडतोस ?
आधीच हे कळालं असतं तर किती बरं झालं असतं
तैवानच्या सिपीयूचं देशी मदरबोर्डबरोबर जुळतच नसतं
जाऊ दे ना झाले आता, व्हायचे ते होऊन गेले
सगळेच जुळून आले तर हे प्रॉब्लेम नसते आले
प्रॉब्लेम्स आहेत म्हणून तर सोडवतोय ना रे आपण
लो क्लास लोक म्हणतात हेच असतं जीवन......!!
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा