ना पाहिलं ना भेटलं
फ़क्त शब्दांत अनुभवलं
कधी साथ देत तर कधी
कोवळ्या वादात गुंतलेलं

मी ऎकलेय भाव तुझे
तुझे शब्द माझ्याशी बोलतात
हसत, खेळत, बागडत
कागदावर असेच उतरतात

तु गातोस शब्द माझे
ते ओठांत तुझ्या फ़ुलतात
सहज, सुंदर, सुमधुर
मनात येवुन गुणगुणतात

तु कधी असा तर कधी कसा
रंग बदलणारा बहुरुपिया जसा
मनाच्या खोलीत खोल शिरत
गोल फ़िरणारा भोवरा जसा

तुझे बदलणारे रंग
माझ्यात रंग भरतात
भोवर्‍यात गोल फ़िरत
माझे श्वास गुंतवतात

तुझे असणारे आभास
माझ्यात जिव ओततात
एकटेपणात अलगद येवुन
सोबतीची चाहुल देतात

माझ्या मनात मी
तुला असच कोरलय
प्रत्यक्ष न भेटता
माझ्यातुनच तुला चोरलय

अस कस रे हे नातं.....तुझ आणी माझ ??

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी


टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top