>>त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".

>>
माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत
वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न
ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच
घाव घातला' .

>>
वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,
तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली,
"हा मझा मित्र शरद तळवलकर"
"हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे,
हा चांगलाच असरणार!"
"हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं.
"अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात
एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही.
म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!"

>>
पु.लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद

" मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा
आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे
भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा
मोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज
खाली येतो की नाही बघ."

>>
पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखविणारा आहे. ते पंधरा
र्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चीं केळकराचं व्याख्यान
होत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती.

त्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा चालु होती.
शाळकरी पुरषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन फेडरेशन स्वीकारावं,
की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला.

त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. "स्वीकारू नये, पण राबवावं" यावर पुरुषोत्तम म्हणाला, "मला आपलं उत्तर कळलं नाही."
तेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले, "बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा." ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला,
"पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे" तात्यासाहेबांच काही उत्तर येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं.

>>
एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.
बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार".

ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले.
"तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"

>>
पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात.
'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती.
समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते.
मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं
ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये."

>>
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना! आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!"

>>
माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका.
एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते.
हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?"
लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या.
ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, "अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!"

>>
कोल्हापूर आणी तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या मर्मबंधातील ठेव. कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सागंताना ते म्हणाले, 'इथे रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगर्याच्या नंगारा करतात. कोल्हापूरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे. त्यानं शेतात ऊसं लावला' याच इग्रंजी रूपांतर इथल्या मुन्सफानं एकदा ' He applied U'S In his farm असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुध्दलेखनच्या नियमाप्रमाणं 'यू' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता.

>>
एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय ___हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच___!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!"

>>
नवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे शुध्दलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडाळात घाटत होतं. त्यावर पु.ल. नी खालील छेद दिला, 'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो लिवा. कयाssssळs!'

>>
साहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु.ल. ना आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असता- नांच पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ' काय पडलं हो?' 'नाटक दुसरं काय?' पु.ल. उत्तरले.

>>'वॆद्यकातली एकच गोष्ट या क्रीकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चुर्ण व्हावे. गोट साफ.' - इती पु.ल.

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top