मी वर्गात सर्वात शेवटी, ती पहील्या बाकावर होती...
म्हणाल तर अंतर बरचं, म्हणाल तर हाकावर होती...

कधी कधी मला पहायची, हसायचीही अधून मधून...
पण घरण्याची अब्रु, म्हणे तीच्या नाकावर होती...

केशर मसाले दुधाची, तशी न्यारीच काही वेगळी...
पण तहाण भागवायची वेळ, आमची ताकावर होती...

आमच्या खिशात सुट्टे, कधी नोटाही असायच्या...
पण तीची भुक म्हणे, हजार नि लाखांवर होती...

रोज पाठलाग करत, तीच्या घरापर्यंत पोचायचो...
पण एक बांधालेली कुत्री, तीच्या दारावर होती...

चंद्र मी आणला होताच, सर्व तारेही तोडलेले...
सारं तीचचं होतं फक्त, मदार तीच्या होकारावर होती

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top