रोज वाटत निजताना
   आज माझ्या ऐवजी
   वीज तू बंद करावी
   पलंगावरी तू आणि
   तुझ्या मिठीत मी असावी

रोज वाटत निजताना
   मनाची भाषा
   ओठांनी बोलावी
   ओठांना साथ शब्दांची नव्हे
   फ़क़्त आणि फ़क़्त स्पर्शांची असावी

रोज वाटत निजताना
   आपल्या दोघांत फ़क़्त
   एक उशी आणि एक चादर असावी
   पण चादरीत येण्याच कारण
   ती नटखट गुलाबी थंडी असावी

रोज वाटत निजताना
   तुला-मला मदिरे प्रमाणे
   निस्सीम प्रेमाची नशा चढावी
   आणि थरथरत्या खट्याळ स्पर्शाना 
   काळोखाची साक्ष असावी

रोज वाटत निजताना
   बांधलेल्या केसांची वेणी
   तूच तुझ्या हातानी सोडावी
   कुर्वाळताना रेंगाळणारी बोटे
   हळूच माझ्या केसांत गुंतावी

रोज वाटत निजताना
   आज हि आकाशाला भिडणारी
   छान छान स्वप्न पहावी
   पूर्ण करण्याची जबाबदारी माझी
   पण स्वप्न मात्र तुझ्या कुशीत दिसावी

अन रोज वाटत उठल्यावर
   पहाटे पहाटे तुझी निज
   माझ्या ओल्या केसांनी खुलावी
   मग निज मोडल्याची शिक्षा म्हणून
   पुन्हा एकदा अंघोळ तुझ्या सोबत व्हावी
Smiley
  
कवियेत्री : प्राची झेंडेकर

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top