श्रावणात पडतात सरीवर सरी
-----रावा्ंचे नाव घेते ---- हि बावरी

अमुआ कि दालि पर बोले कोयलिआ
......के सन्ग बिते सारि उमरिया

चान्दिच्या ताटात गाजराचा हलवा ,
--- रावांच नाव घेते सासुबाईना बोलवा.

गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
----- नाव घेते सोडा माझी वाट

हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात
---- बसले दारात मी जाऊ कशी घरात

हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे
....... चे नाव घेते सत्यनारायणापुढे

आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले
--- चं नाव घ्यायला --- अडवले

हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात परातीवर ठेवला भात,
भातावर वाढले तुप ते झाले खुप, म्हणून नेले पंढरीला, पंडुरंगाच्या दर्शनाला,
येताना आणले खण ३, आई म्हणे मला, नणंद म्हणे मला ---- म्हणे मी तुझ्यासाठी आणुन केला गुन्हा





रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित
मागते आयु्ष्य ----- च्या सहीत


संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव ------- ची जोडी


साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
--- नाव घ्यायला आग्रह कशाला


कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
..... आहेत माझे पूर्व संचित


वड्यात वडा बटाटावडा,
... मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा.




लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
.... च्या जीवावर कर्ते मी मजा.


भाजीत भाजी मेथीची,
......माझ्या प्रितीची.


सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.





टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top