आयुष्यात येताना जाताना लोक भेटतात
एकमेकांच्या ओळखी होतात
एकमेकांमध्ये मैत्री होते
आणि ती ओळख अगदी द्रुढ होऊन जाते

पण एकदा अशी ओळख होते
जणू असे वाटू लागते
वर्षा वर्षांची मैत्री असावी
जेव्हा होते अशी ओळख
तेव्हा नाती जुळतात अनेक

अशी ही ओळख मित्रा मित्रांमधली
अशी ही ओळख नात्या नात्यांमधली
अशी ही ओळख तुझी नि माझी
जणू ती ओळख मनात जाऊन रुजते

कधी अशीच भेटते ती ओळखणारी व्यक्ति
कधीच न बोललेल्या गोष्टी आम्ही बोलतो
बोलता बोलता ती ओळख पाळख विसरून जातो
एकमेकांच्या विचारांत हरवून जातो

कधी मला भेटते ती ओळखणारी व्यक्ति

ओळख न दाखवून निघून जाते
राहून जातात त्या गप्पा
विसरून जातात ती जुळलेली नाती
अचानक का होईना पण,,,,
होऊन जाते ती व्यक्ति मजसाठी अनोळखी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top