( उशिराने आलेलं ) शहाणपण.....
रहायला भलं मोठठ घर आहे
झोपायला स्वतंत्र खोली आहे
अंगावर पांघरणारे "बाबा" नाहीत.....
म्हणून झोप मात्र हरवली आहे !

जेवायला रोज चमचमीत मिळते
आतून ढेकर मात्र येत नाही !
शिळ्या पोळी-पिठल्याची चव यावी
म्हणून रात्री एक पोळी उरवली आहे !

कामावर जायला कंपनीची बस आहे
इमर्जान्सीला मोबाईल फोन आहे
सुबत्ताअसूनही मुलं नाखूष का?
गरीबीत पण आमची सोय कशी पुरवली आहे?

या कुशीवर वळतो , बाबा दिसतात
त्या कुशीवर वळतो , आईचे कष्ट दिसतात
उताणी पडलो तर मन मारलेले ताई-दादा दिसतात
आठवांच्या आसवांत रात्र रात्र जिरवली आहे !

सुखांसाठी पैसा लागतो पण.....
नुसत्या पैशाने सुख मिळत नाही !
कष्टाची बी प्रेमाच्या खताने आता मी
समाधानाच्या मातीत जिरवली आहे !.......


टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top