मुलींना ओळखणं कठीण असतं………...
मुलींना ओळखणं खरंच कठीण असतं का हो? त्यांच्या मनात काय चालू असतं हे एक देवच काय ते जाणे अन् ती मुलगी...
तुम्ही तिची तारीफ केली, तर तिला वाटतं तुम्ही खोटं बोलता आहात
तारीफ केली नाही, तर तुम्हाला मुलींशी कसं वागायचं तेच कळत नाही.
तिच्या सगळ्या म्हणण्याला होकार दिला, तर तुम्हाला स्वत:चे विचारच नाहीत
होकार नाही दिला, तर तुम्ही तिला समजूनच घेत नाही.
तुम्ही तिला वारंवार भेटलात, तर ते किती बोअर असतं
तिला वारंवार भेटला नाहीत, तर तुम्ही तिला डबलक्रॉस करताय?
तुम्ही वेलड्रेस आहात, तर तुम्ही नक्कीच प्लेबॉय आहात
तुम्ही नीट कपडे केले नाहीत, तर तुम्ही किती गबाळे आहात हो?
तुम्ही जेलस होता, किती वाईट आहे हे!
तुम्ही तिच्यासाठी जेलस होत नाही? तुमचं तिच्यावर प्रेमच नाही
तुम्ही तिला किस करता, तर तुम्ही जण्टलमनच नाही
तुम्ही किस करत नाही, तर तुम्ही मॅनच नाही
तुम्ही तिला वारंवार किस केलं, नाही तर तुम्ही किती थंड आहात
तुम्ही तिला वारंवार किस केलं, तर तुम्ही तिचा गैरफायदा घेत असता.
तुम्ही तिच्याशी प्रेमात येताय? तुम्हाला तिचा आदरच वाटत नाही
नाहीतर तुम्हाला ती आवडतच नाही.
तुम्हाला यायला एक मिनिट उशीर झाला, तर वाट पाहणं किती कठीण असतं?
तिला यायला उशीर झाला, तर मुलींना होतो असा उशीर!!!
तुम्ही कोणाला भेटायला गेलात, तर तुम्ही वेळ फुकट घालवता
ती कोणाला भेटली, तर ते कामासाठी असतं...
रस्ता ओलांडताना तिचा हात धरला नाही, तर तुमच्याकडे एथिक्सच नाहीत
तुम्ही हात धरला, तर तिला स्पर्श करण्याची संधीच शोधत असता.
तुम्ही दुसऱ्या स्त्रीकडे पाहिलं, तर तुम्ही फ्लर्ट करता
दुसऱ्या पुरुषाने तिच्याकडे पाहिलं, तर तो तिच्या सौंदर्याचं कौतुक करत असतो.
तुम्ही बोलत असाल, तर तुम्ही ऐकावं असं तिला वाटतं
तुम्ही ऐकत असाल, तर तुम्ही बोलावं असं तिला वाटतं.
अशा या साध्या, तरीही समजून घ्यायला कठीण अशा मुली. यांना समजून घेणं कठीण असलं, तरी हव्याहव्याशा अशा याच मुली...
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा