मराठी पी.जे....
>हे हुंग ते हुंग
भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ?
>हिंदुस्तान लिव्हर
नेपाळमध्ये चोर्या का होत नाहीत ?
>कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
>उभा का बस की
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
>कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
>वर्षा अ खेर
हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
>ओला होईल
ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
>माऊ ली
त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
>थोर ली
लहान बहिणीचे नाव काय ?
>धाक ली
जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?
>घड्याळ दुरुस्त करण्याची !
दोन चिमण्या असतात त्यातली एक म्हणते "चिऊ" दुसरी काहीच म्हणत नाही! का?
>कारण दुसरी चिमणी Factory ची असते.
कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?
>कारण वाटेत नळ स्टॉप आहे.
ढिशुम ढिशुम: एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत. का बरं?????
>कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहे ना....
रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
कारण लहानपणी ..
>रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे..
पुरातन काळातले हाडांचे सांगाडे सापडल्यानंतर त्यातला कोणता पुरुषाचा आहे आणि कोणता स्त्रीचा, हे पुरातत्त्वशास्त्रज्ञ कसे ठरवतात?
>दोन्ही सांगाड्यांचे जबडे पाहायचे. जो जास्त घासला गेला असेल, तो स्त्रीचा!!!!
संता कम्प्युटर कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला भटिंड्याहून प्रथमच मुंबईला आला होता. मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं, ''तुम्हाला एमएस ऑफिस माहिती आहे का?''
>संता म्हणाला, ''आप बस अड्रेस दो जी, मैं पहुंच जाऊँगा!!!!''
पप्पा कांगारू -अगं आपली बेबी कुठाय?
>मम्मा कांगारू -ओ माय गॉड! कोणी तरी माझा खिसा कापलेला दिसतोय.
नुकतीच ससा आणि कासवाची पुन्हा एकदा शर्यत झाली. आणि त्यात ससा मागे पडला. पण तरीही शर्यत ससाच जिंकला... का?
>कारण...शर्यतीला डकवर्थ लुईस नियम लागू केला होता ना.
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा