एक रोमहर्षक प्रपोज


तू फ़क्त माझ्या सोबत होतिस ह्या आठ्वानिनेच किती सुखावतो मी,
ते तुझं माझं वाळू वर एकत्र पायाची छठा उमटवत दूरपर्यंत चालणं, थोडंसं दुरच असायचो आपण.....,
आणि
आणि अचानक बोलता बोलता नकळत जवळ यायचो.. अलगद मग एकमेकांच्या हातांचा
दोघांनाही हवा हवासा असणारा सुखद स्पर्श व्हायचा,
त्यातूनच मग कधीतरी चोरटी नजर एक व्हायची..
मग तू लाजुन गालात हसायचीस मी नजरेन खूण करून विचारायचो " काय झालं ...? "
आणि तू सुद्धा नजरेनचं सांगायचीस "काही नाही... "
आणि मग आपण एकत्र हसायचो ..
दोघांनाही कळायचं एकमेकांच्या नजरेतलं..
पण पहिलं बोलणार कोण हा प्रश्न पडलेला असायचा..
बराच वेळ मग आपण बुडत्या सुर्याकडे बघत बसायचो
कित्येक वेळा मनातुनच एक मेकांना
हळूवार होकार द्यायचो..
मग मनात विचार यायचा तुझा हात हातात घेवू का ...?
पण नंतर मनातच म्हणायचो बघुया ही स्वताहून देते का....?
असच एकदा नकळत जवळ आलो
आपल्यातलं अंतर कधी संपलं समजलाच नाही.
त्या दिवशी सूर्य जवळ जवळ बुडतच आला होता..
आकाश अगदी स्वच्छ तांबुस गुलाबी रंगनी भरलं होतं, थोडीशी मंद कुंद हवा सुटली होती..
तीच हवा तुझ्या ओढणिला सारखी माझ्या चेहर्या भोवती गुंडाळीत होती
आणि मी सारखा
तुझी ओढणी माझ्या हातांनी बाजूला करत होतो,
एकदा मग तू न राहुनच ती ओढणी
माझ्या चेहर्या वरुण बाजूला करायला तुझा हात
माझ्या चेहर्या वरुण ओढलास..
आणि त्या वेळेसचा तुझ्या मखमली हातांचा स्पर्श झाला
आणि न राहून मी तुझा
हाथ माझ्या हातात घेतला...
दोघान्च्या ही नजरेत तेंव्हा अगदी समुद्र भरून
रोमांच भरला होता
मी थोडासा तुझ्या अजुन जवळ आलो अणि तुझा चेहरा हातात
घेतला
आणि तुला विचारलं होतं " कळतं का ग तुला माझ्या मनातलं ...? "
तू म्हणाली होतिस " कळतय ना ",
" मग हे असं कित्ती दिवस चालायचं ..?
सांग ना.. " मी म्हणालो ..
तू म्हणालीस " मी नाही जा ", "
अगं असं काय करतेस सांग ना..?"
तू तुझा चेहरा माझ्या हातातून काढून घेण्याचा
प्रयत्न करीत नजर झुकवत बोललीस...
" सांगू माझं तुझ्यावर प्रेम आहे " .....


























टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top