💕 तु मिले दिल खिले 💕




जवळ जवळ दोन वर्षा पासुन गणेश जयंती साठी ये असा आग्रह चालु होता त्याचा.. काही कारणास्तव तिलाही जाणं जमत नव्हत.. 

या वर्षी येचं असा त्याचा हट्ट..अन् त्या कारणावरून आदल्या दिवशी थोडस वाजलेल त्या दोघांमध्ये....

मंडळाचा कर्ता,धर्ता तोच. सगळी सूत्र त्याच्याच हाती. शेकडो लोकांना एका वेळी एका जागी खिळवून ठेवण्याचे अंगी नेतृत्व. एरिया मध्ये बाप्पा नंतर याच्याच नावाची ख्याती....

त्याला न सांगता सरप्राइज visit द्यायचं ठरलं तिचं.. संध्याकाळी ऑफिस मधून थोड लवकर घरी येऊन तयारी करुन निघालीही.  एरिया मधे पोहचली की घ्यायला ये असा Text MSG तिने त्यांच्या मधील एकमेव कॉमन फ्रेंड ला टाकून ठेवला. ८ च्या दरम्यान ती मंदिरात हजर.  कोणी तरी बडी आसामी आलेली, स्वागत समारंभ चालु होता अन् त्याचा आवाज पुर्ण एरिया मधे घुमत होता..तो रुबाबात कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दृष्टीस पडला तीच्या.. जवळ जवळ ६फूट उंचीचा तो, तीच ऐट, तोच रुबाब, आत्मविश्वास तर नसानसात भिनलेला..  कमी वयात स्व कर्तृत्वाने नावा रुपास आलेला तो. आज त्याचा थाट ती याची देही याची डोळा पाहत होती. त्याच्या जवळ जाऊन गालावर ओठ टेकवावे असा विचार येऊन गेला तीच्या मनात त्या क्षणी. त्याच्या प्रती असलेला आदर आज कित्येक पटीने वाढला होता. अभिमान होता तो तिचा.


 ती येईल असं ध्यानी मनी ही नसताना दर्शनाच्या लाईन मध्ये ही आबोली कलरच्या काठ पदर साडी मध्ये, त्यावर मॅचींग मोठे झुमके, बाकी सगळं सोबर अन् सुटेबल अशा अटायर मधे नजरेस पडली त्याच्या.. दोन क्षण तो पुर्ण ब्लँक. नक्की तीच आहे ना की मला भास होतोय असे काहीसे चेहऱ्यावरील  गोंधळलेले हावभाव . अरे वेड्या 

हो मीच आहे पण तो आधी हातातला माईक सांभाळ असं काहीसं नजरेने तीच सांगणं..

 त्या क्षणी त्याच्या डोळ्यात आश्चर्य, आनंद, प्रेम,, सगळ्या भावना अगदी ओसंडून वाहत होत्या...

 

 दर्शन झालं की त्या तिथे उभी रहा मी येतोच १५ min मध्ये असा msg मित्रा करवी तिला मिळाला होता. तिला माहित होत १५ min मधे तो तिथून बाहेर पडण केवळ अशक्य.

 तोपर्यंत त्याच्या कार्यक्रमाच्या समोर उभी राहून नजरेनं त्याला छळण चालु केलं होत तिने.. त्यावर त्याने गोड हसुन नको ना छळू च डोळ्यातून केलेलं तितकंच गोड आर्जव..

  साडेनऊ च्या दरम्यान मी निघते असा इशारा केल्यावर पुढच्या मिनिटाला हातातला माईक जबरदस्तीने मित्राच्या हातात दिला ही .

  पुढचं तु सांभाळ मी आलोच असं काहीसं बोलुन सगळ्यांच्या गोंधळलेल्या नजरा झेलत तो तिथून सटकलाही.🥰😂 तिला भेटायची जी ओढ होती. तिला साडी मधे पाहण त्याच्या साठी एक पर्वणीच जणु.

   त्याच्याच एरिया मधुन त्याच्याच मंडळातून, त्याच्याच मित्र परिवाराच्या डोळ्यासमोरून, काही वेळा साठी त्याला तिथून गायब करायची हिंमत फक्त तिच्या मधेच होती. भर रस्त्यात काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले ते दोन जीव... दोघांना एकमेकांबद्दल अपार प्रेम, आदर, अभिमान अन् काळजी. एक side hug देऊन हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवून , तिला ऑटो मधे बसवून त्याने त्याचं नेहमीच काम ऑटो चा no. टिपून घेऊन तिच्या सुरक्षेततेची काळजी घेऊन पुन्हा आपापल्या मार्गाला रवाना झाले होते.. 

   तु केलेल्या छळवादा चा व्याजा सहित बदला घेतला जाईलच.. असा text तीच्या mobile screen वर show झाला..  अन् एक गोड हसू दोन्हीं गालावर पसरले त्याच्या हि अन् तिच्या ही..

   तिचं आजचं येणं सार्थकी लागलं होत.🥰

   

  डोळे भरून पाहून ही मन न भरण्याची दोघांचीही वेळ कदाचित पहिलीच .🥰😍❤️❤️

साभार - लेखिका: राजेश्वरी शिगवण

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top