चारोळ्या
♡♥♡♥♡
प्रेमाच्या वाटेवर तीचे पाऊल कधी वळलेच नाही कितीही यत्न केले तरीही माझे मन तीला कळलेच नाही.
♡♥♡♥♡
माझे आसू पुसून तिनं आमच्या सुखात हसावं कधीतरी वाटतं यार, आपलंही कुणीतरी असावं!
♡♥♡♥♡
नसशील तू चाफेकळी, वा न कोमेजणारी बकुळी तरीही मला आवडतेस, आहेस तशीच वेडीखुळी.
♡♥♡♥♡
स्पष्टीकरण करणं सोपं आहे थोडक्यात सांगणं कठीण आहे चार शब्दांत सांगायचं तर माझं तुझ्यावर प्रेम आहे.
♡♥♡♥♡
गुलाबचे फुल तुला देताना, त्याचे काटे माझ्या हातात रुतले, डोळे मात्र तुझे पाणावले..
♡♥♡♥♡
वाटतं आपण एकदा पुन्हा अनोळखी व्हावं, ओळख करायला तुझ्याशी पुन्हा धडपडावं.
♡♥♡♥♡
खट्याळ वार केव्हा पासुन तुझ्या केसांशी खेळत होता माझं मन मात्र उगाचच जाळत होता.
♡♥♡♥♡
मन कुणाचं जाणताना भाषेची गरज भासते, तुझं मन तुझ्या डोळ्यात दिसतं तिथे भाषेची गरज नसते.
♡♥♡♥♡
ओठापर्यंत आलेले शब्द मी मोठ्या कष्टांनी मागे वळवले पण डोळेच असे चुकार की बोलायचं ते बोलून गेले.
♡♥♡♥♡
माझ्या भिजलेल्या-तहानलेल्या पापण्यांना तुझ्याच भावनांचा आधार आहे, तुझ्या चेह-यावरच्या ओठपाकळीला माझ्याच ओठांचा पुकार आहे.
♡♥♡♥♡
तुला खुप काही सांगायचं असतं पण तू कधी बोलतच नाहिस आता डोळ्यांनी तरी सांगू किती माझ्या भावना तू समजुनच घेत नाहिस
♡♥♡♥♡
आज पावसाने सकाळी दिली मनाला उभारी, पण तुझी आठवण आल्या शिवाय राहिली नाही. कोणीही किती ही समजावले तरी, तुला विसरणे ह्या जन्मात तरी शक्य नाही.
♡♥♡♥♡
पाणावलेल्या कडा म्हणतात विसरु नकोस मला, ओठांवरच स्मित म्हणतं आठवेलच मी तुला.
♡♥♡♥♡
तूला एकदा बघण्यासाठी गच्चीवर तासन तास घुट्मळणे, तू बघायचीस पडद्याआडून तूला आवडायचे मला छळणे…
♡♥♡♥♡
तुझ्याशी बोलातना फार फार आनंद होतो, मनातल्या मनात मी नाचत असतो, वर वर दाखवत नसलो तरी, माझ्या मनातले भाव तुझ्या मनात शोधत असतो.
♡♥♡♥♡
माझ्या आनंदाच नातं तुझ्या हास्याशी आहे, माझ्या दुःखाच नातं तुझ्या अश्रूंशी आहे.
♡♥♡♥♡
एकदा प्रेमाने विचारले विश्वासास, आपल्यातील नाते काय? विश्वास उत्तरले..मीच तुझे प्रेम आणि तुच माझा विश्वास !!
♡♥♡♥♡
तुझ्या प्रेमाची चाहुल लागताच झाडे वेली हलू लागतात आणि माझ्या मनामध्ये शब्द शब्द जुळू लागतात.
♡♥♡♥♡
तुझ्या मोहक हसण्यामध्ये माझे 'मीपण' हरवून बसलो मला ना माहित, कधी न कळले कसा, कुठे अन केव्हा फसलो.
♡♥♡♥♡
सगळ्या गोष्टी कशा भराभर घडत गेल्या मी प्रेमात पडलोय म्हणेपर्यंत एकाकी कातरवेळा उठवायला आल्या.
♡♥♡♥♡
-- With Lots Of Love Sachin Haldankar. ♡♥♡♥♡
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा