मंद हि गुलाबी लहर
नशा आणिती मन्मनी
उधळूनी शुक्राचे चांदणे
भाव जपते लोचनी

न सहावे गारवा हा
घे अलगद तव मीठीत
श्वासाचे गीत गाऊ
भेटू पुन्हा ओळखीत
घेऊ गारवा ओठांचा
अंग अंग शहारुनी
श्वासाच्या या ओढीत
अंतरंगी बावरुनी................

द्यावे स्पर्श तू तुझे
घ्यावे मी आपले मानून
स्पर्शवेड्या करांचे
बंध नवे अनुभवून
जाणू गारवा करांचा
स्पर्श स्पर्श सावरुनी
घे ओठांत साजणा
श्वास तुझे आवरुनी..................

कसे हरवले गुलाबी जादूत?
न कळेच माझे मला
प्रभातवेळी पहिल्या दवात
जरी भेटते रोज तुला
अशीच रहावी रात साजणा
गारवा अपुला पांघरुनी
गुलाबी थंडीत स्पर्शाच्या
ऊब 'ग्रीष्माची' घेउनी.......................

साभार - कवियेत्री: प्रिती खेडेकर

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top