दगडू :- ये पारजकता , आइकना .
प्राजक्ता :- पारजकता काय प्राजक्ता नाव आहे
माझ ?
दगडू :- हं तेच ते ,
आपल्यालाना कायतरी बोलायचा होता तुझ्याशी
प्राजक्ता :- काय ,
काय बोलायचं तुला ?
दगडू :- थांबहा
( सोबत आणलेले कमळाच फुल पुढे
करत ),
आपल्याला लाइन देणार काय ?
प्राजक्ता :- म्हणजे ?
दगडू :- तू आपल्याशी लग्न करून
माझ्या घरी भाकरी भाजायला येशील का ?
प्राजक्ता :- हे अस विचारनारेस तू मला ?
आणि कोणी कमळ देत का विचारताना ?
दगडू :- हे बघ आपल्याला जस येत तसं विचारल .आणि
आपण तुझ्यावर खूप प्रेम करतोना
गुलाब खूप छोटा वाटेल त्या समोर म्हणून हे कमळ कळल
ना .
प्राजक्ता :- आणि लाइन देशील का काय अस
तरी विचाराय्चास ना .
"हे सुंदरी, काकवीने भरलेला हा कमलद्रोण मज
हस्ति ग्रहण करून
मी तुजला पूसतो की तुजिया मनोमुकुरी उभासले
राजकुमार मजरुपाने या भूतलावर अवतीर्ण
जाहला आहे असे तुजला प्रतीत होत असल्यास
तुजिया मुखाद्वारे होकारार्थी चित्कार येवू दे..".
दगडू :- हे काय होत ,
कामाल्द्रोन चीत्भूत काय ?
ये आपल्याला अस काय जमणार नाय .
आपल्याला फक्त येवडा माहित्ये आपण टाईमपास
नाय करते, आपल सिरीयसली जाम प्रेम आहे तुझ्यावर .
आपण आईबाबा आन साईबाबाची शप्पत घेऊन
सांगतो
आपण लग्न करणार तर तुझ्याशीच.फक्त तू हो म्हण .
प्राजक्ता :- मी हो म्हणेन पण एक प्रोब्लेम आहे ,(हसत )
.
.
.
.
.
.
मला भाकरी भाजता नाही येत . .
.
.
.
चपाती येते
दगडू :- आयुष्भर तुझ्या हातची चपाती पण चालेल
आपल्याला....♥♥


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top