२८ जुलै २०१३, श्री स्वामी समर्थ मठ आणि पळसधरी वॉटरफॉल पिकनिक फुलटू धमाल करून पार पडली !!!




पिकीनिक ची वाट पाहत असलेल्या  सर्व सभासदांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला 




आम्हाला अपेक्षा पण नव्हती त्यापेक्षा खूप मोठा प्रतिसाद आम्हाला तुम्ही दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद 



बहुतेक जन दादर वरून आणि इतर सभासद मधील वेगवेगळ्या स्टेशन वर आम्हाला भेटून सामील झाले.आणि पळसधरी स्टेशनवर भेटले आणि आम्ही तिकडे छान  असा ग्रुप फोटो काढला 



मग  थेट, मस्त चीखलदार रस्त्यातून पायवाट काढत काढत....रेल्वे ट्रेकचा मार्ग धरत, सुन्दर अशा गावात प्रवेश केला 



पहिलं श्री स्वामी समर्थांच्या मठात जाऊन त्यांच्या मनोहर रूपाचे दर्शन घेतलं, ध्यान धारणा केली




मनाला विलक्षण  समाधान लाभल


सर्वांना भूक लागलेलीच मग परतून गरमागरम चहा  आणि पोह्यांचा आस्वाद घेतला
.


आणि  मग लगेच पळसधरी धबधबा गाठण्यासाठी प्रयाण केल


 रिमझिम  रिमझिम सरींनी स्वागतासाठी वर्णी लावलेली 



मग पावसातून आणि डोंगरदर्यातील हिरवळ अनुभवत  आम्ही धबधब्यापर्यंत पोहोचलो


आणि सर्वांनी धम्माल मस्ती करायला सुरवात केली


एकमेकांना पाण्यात ढकलणे, थट्टा-मस्करी सुरु झाली


सर्व जन वेगवेगळ्या प्रकारे मस्ती करून तिथला आनंद अनुभवत होतो 



छोट्याश्या ओढ्याखालील धबधब्याखाली सुद्धा मजा केली...


त्या ठिकाणाहून कोणालाही परतावं असं वाटत नव्हतं,


थोड्यावेळाने पाण्यात मजा मस्ती केली



आम्ही मग परतीचा प्रवास सुरु केला


परतून सर्वांनी मस्त गरमागरम चविष्ट अशा जेवणावर ताव मारून पोटभर जेवण केले



थोडासा आराम करून परतीच्या वाटेवर निघालो



तुम्ही सर्वांनी मन माझेला जो प्रतिसाद दिलात, जे आनंदाचे क्षण आमच्या सोबत घालवलात ते नेहमीच आमच्या स्मरणात राहतील.


पिकनिक मध्ये सहभागी झालेल्या सर्व सभासदांचे मनापासून आभार.

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top