रात आजची कोजागिरीची
शरदातील त्या पौर्णिमेची

शोधीत होते नयन वेडे
आस मनी त्याच्या मिलनाची

ती रातच त्याची , त्याच्या सौंदर्याची
त्याला सजविणा-या असंख्य तारकांची

पण तो हरवलेला, चांदण्याही कुठे लपलेल्या
असंख्य नजरा त्याच्या दर्शनास आतुरलेल्या

काळोख दाटलेला, पाउसही पडत होता
चंद्र कोठे सापडेना, तो वरचाही रडत होता

मला मात्र उमगलं, का होता तो लपला
पाहुनिया त्या सुंदरीस, तो ही हिरमुसला

गोरी गोमटी ती सुंदरी, अवतरली जणु ती परी
ना साज कशाचा तीस, नार देखणी ती तरी

टाळलं जरी मनाला, जाई नजर तिच्याच वरी
पाहण्यास तिला तोही, आला होता भूवरी

परेश चाफे

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top