होरा या कालविभागापासून वाराची उत्पत्ती झाली. एका अहोरात्रीचे २४ समान
भाग केले असता त्यातील एक भाग म्हणजे होरा. हल्लीच्या तास या अर्थानेही
हा भाग घेतला जातो. प्रत्येक होर्‍याला कुठलातरी ग्रह अधिपती असतो.
त्याचे नांव वाराला दिले आहे. "उदयात उदयं वारः" सूर्योदयात उगवतो तो वार
असा या सूत्राचा अर्थ आहे. धार्मिक कारणांसाठी सूर्योदयापासून दिवसाचा व
वाराचा प्रारंभ केला जातो.

"आ मंदात शीघ्रपर्यंतम् होरेशा:" असे वारांचे सूत्र आहे. मंदग्रह ते
शीघ्र ग्रह असे आहेत -- शनी, गुरू, मंगळ , रवी, शुक्र, बुध, चंद्र.
     शनीवारी पहिला होरा अथवा तास हा शनीचा, पुढील तास गुरूचा, तिसरा मंगळाचा,
चवथा रविचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा. याप्रमाणे
तीन वेळा २१ होरे झाल्यावर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा
येतो असे २४ तास पूर्ण होतात. त्यानंतर दुसरा दिवस सुरू होतो तो पुढील
म्हणजे रवीच्या होर्‍याने. म्हणून शनिवार नंतर रविवार येतो.

जन्मदिवसावरुन भविष्य:-
 
सोमवार

ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति शांत स्वभावी, गोड बोलणारी त्याचप्रमाणे
व्यवहारज्ञानी असते. मोठयांचं अनुकरण करणारी, त्यांच्या आज्ञेत राहणारी,
सुखदु:खात समान राहणारी आणि उदार असते.

मंगळवार

ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति बाताडी, खोटं बोलणारी, भांडण्यात तत्पर,
उच्च हुद्दाधारी, शेतीच्या कामात रस घेणारी आणि तापट असते.

बुधवार

ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति रुपवती, गोड बोलून टीकाटिप्पणी करणारी,
मस्करी करण्यात हुशार, हरहुन्नरी, इतरांचे गुण- अवगुण पारखणारी, अब्रुची
काळजी घेणारी आणि व्यवसायिक वृत्तीची असते.

गुरुवार

ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति उत्तम विद्याभ्यासी, स्वत:च्या इच्छेनुसार
वागणारी, मनमिळाऊ स्वभावाची, अक्कलहुशारीनं धन मिळवणारी आणि थोरांकडून
मान- सन्मान मिळवणारी असते.

शुक्रवार

ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ती काळ्या- कुरळ्या केसांची, उत्तम वस्त्रं
परिधान करावयाची हौस असणारी, सदाचारी, मोठयांची मानमर्यादा राखणारी आणि
उच्च हुद्द्यावर नोकरी करणारी असते.

शनिवार

ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति अतिशय बुद्धिवान, मंत्र -तंत्र विद्येत रस
असलेली, मायाळू, स्वकर्तृत्ववान आणि सर्वांना आवडेल अशी असते.

रविवार

ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति बहादुर, गहुवर्णी, उत्साही, दानशूर आणि ती
इतकी मनस्वी असते की निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होते.


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top