प्रेम आहे, तिथे 'पझेसिव्हनेस' येतो हे मान्य पण, म्हणून उठताबसता आम्ही कुठे जातो,
काय करतो, कधी येतो याबद्दल सारखेसारखे सवालजवाब करायला नको.

सतत एकमेकांबरोबर राहता येत नाही पण, शक्य तेव्हा दोघांनी एकत्र वेळ घालवायला हवाच.
शॉपिंगला, जिमला एकत्र जाऊन आपल्यातलं बॉण्डिंग अधिक घट्ट करता येतं.

डिनर किंवा आऊटिंगला जाऊनच 'रोमॅण्टिक' डेट साजरी करायला हवी, असं अजिबात नाही.
घरातल्या घरातही एकमेकांबरोबर क्वॉलिटेटिव्ह वेळ घालवता येतो.


तुम्ही निर्माण केलेल्या विश्वात आम्ही रमतो ना?
मग, आम्ही निर्माण केलेल्या गोष्टींवर जीव टाकायला तुम्हीही शिकलं पाहिजे.

तुमच्या मीटिंग्ज, आऊटडोअर, बॉस या सगळ्या गोष्टींना आम्ही समजून घेतो,
तसंच आमच्या कामालाही तुम्ही समजून घेतलं, तर हरकत काय?

आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. पण, कामाच्या बाबतीत किंवा काही गोष्टींमध्ये
आम्हाला आमची स्पेस हवी असते, हे कसं तुमच्या लक्षात येत नाही?

आम्ही बायका नवऱ्याच्या फॅमिलीमध्ये मिसळून जातो.
तुम्हीही आमच्या कुटुंबाचा भाग झालात, तर बिघडलं कुठे?

घरातल्या छोट्याछोट्या गोष्टी करायला तुमची साथ मिळाली,
तर अशी कामं करण्याचा आनंद काही औरच असतो.

साभार - लेखिका : अमृता खानविलकर
शब्दांकन : मिताली मापुस्कर

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top