चला दर्शन घेऊया आपल्या शहरातील या आठ महागणपतींचं...……

सिद्धिविनायक, प्रभादेवी
गिरणगावाचा हा देवाधिदेव आता अवघ्या मुंबापुरीचं इष्टदैवत बनलाय. सचिन आणि अमिताभपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणारा बाप्पा.



महागणपती, टिटवाळा
पेशवेकाळापासून प्रसिद्ध असलेला हा सिद्धिविनायक महाराष्ट्रभरातल्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथे आल्यावर लग्न जुळतं अशी एक सार्वत्रिक श्रद्धा आहे.



उद्यान गणेश, शिवाजी पार्क
सिद्धिविनायकाजवळ असूनही याचं महात्म्य कमी झालेलं नाही. गणपती आणि शिवराय ही महाराष्ट्राची दोन दैवतं इथे शेजारी नांदतात.



गिरगाव गणेश, फडकेवाडी
मुंबापुरीतील मराठी माणसाच्या इतिहासाचा जवळपास एकशे दहा वर्षांचा साक्षीदार असणारा गिरगाव गणेश नव्याजुन्या मुंबईकरांचं श्रद्धास्थान. 



वजिऱ्याचा गणपती, बोरिवली
बोरिवली पश्चिमेच्या वजिरा गावातल्या तलावाशेजारी एका शिलेत हा स्वयंभू सिद्धिविनायक प्रकट झाला अशी आख्यायिका. भक्तांच्या गर्दीचं ठिकाण.



वांच्छासिद्धिविनायक, अंधेरी पूर्व
मुंबईचे मूळ रहिवासी असणाऱ्या पाठारे प्रभूंचं हे दैवत. गेली सत्तर वर्ष अंधेरी स्टेशनजवळचं हे मंदिर भक्तांचं श्रद्धास्थान बनलंय. 



सिद्धी गणेश मंदिर घाटकोपर प .
पूर्व उपनगरांतलं हे सर्वाधिक प्रसिद्ध मंदिर. तुलनेने खूपच नवं असलं तरी प्रत्येक मंगळवारी तिथे खूप गर्दी होते.



फडके रोड मंदिर, डोंबिवली
डोंबिवलीचं हे ग्रामदैवत. याच्या साक्षीने मराठी माणसाने डोंबिवलीत साहित्य-संस्कृतीची ध्वजा फडकवली. नववर्षाच्या प्रसिद्ध स्वागतयात्रेची सुरुवात इथूनच. 



हे अष्टविनायक निवडताना पुढील प्रसिद्ध श्रद्धास्थानांचाही विचार झाला. अक्षत गणपती, कल्याण गणेश मंदिर, कुर्ला पश्चिम स्टेशनजवळ उपवन तलाव गणेश मंदिर, ठाणे जोशी आळी गणेश मंदिर, पनवेल फायर ब्रिगेडमधली गणेश मंदिरं वांद्रे कोर्ट गणेश मंदिर अंजूर गाव गणपती, भिवंडी सिद्धिविनायक, सिद्धार्थ नगर, गोरेगाव कांजूर सोसायटी गणेश मंदिर, भांडूप पू. 

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top