प्रिय मित्रानो, 

   दिनांक २६ जून २०११, नेहमी प्रमाणेच मन माझे ग्रुपची चवथी मीटिंग मस्ती मजा करत आनंदात पार पडली. जे सभासद नाही येवू शकले त्यांना सुद्धा आम्ही खूप मिस केल !!                   आपली ही मीटिंग घेण्यामागे हेतू होता, आपल्या २४ जुलै च्या पिकनिक बद्दल अंतिम निर्णय घेणे  आणि त्यासाठी सर्वच आतुर आहेत, हे आम्हालाही  माहिती आहे. तर तयार व्हा हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत फिरायला आणि पावसाळी पाण्यात  चिंब भिजायला ...कारण आपली पिकनिक २४ जुलै,२०११ रोजी पळसधरी येथील वॉटरफॉल आणि श्री स्वामी समर्थ मठ येथे नेण्याचे योजिले आहे. 


       तरी ज्या सभासदांना पिकनिकला यायचं असेल त्यांच्यासाठी काही सूचना:-
      १) पिकनिकचे शुल्क :- रु. ३००  फक्त. ( चहा, नाश्ता, आणि  दुपारचे जेवण समाविष्ट )
      २) येताना स्वतःसोबत एक जोडी (extra) कपडे आणावेत.  
      3) कोणत्याही मौल्यवान वस्तू (चैन, अंगठी वगैरे...) स्वतःसोबत बाळगू नयेत.              
      ४) २४ जुलै २०११ रोजी सकाळी दादर स्टेशन वरून ट्रेन आहे. तरी आपण सर्वाना, ७.०० पर्यंत दादर स्टेशन (पश्चिम) बाहेरील सुविधा सारी सेंटर बाहेर  भेटायचे आहे. जे सभासद बाकीच्या ठिकाणी भेटणार आहेत त्यांनी तसे कळवावे.
सर्वांनी कृपया वेळेवर यावे कारण ट्रेन चुकली तर पुढील ट्रेन लवकर नाही.

     ५) मुंबई, ठाणे, कल्याण जिल्ह्याच्या बाहेरून जे सभासद येण्यास इच्छुक आहेत त्यांनी कर्जत मार्गे यावे आणि पळसधरी स्टेशन वर ९.३० वाजता भेटावे. ( त्यांच्यासाठी शुल्क २५० रु. राहील )
    ६) धुम्रपान आणि मद्यपानास परवानगी नाही.

संपर्क : सचिन हळदणकर ( ९८६९२५७८०८ )
           प्रथमेश राऊत ( ९७७३६८७७६२ )

आभार
टिम मन माझे.....
   

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top