काल पाकिस्तान टीम
आपल्याला सेमी फायनल मध्ये भिडली ..
आपल्या टीम इंडियाने
पाकड्यांना धूळ चारली ...
धुमधडाक्यात सेहवागने सुरवात केली..
उमर गूल ची त्याने चांगलीच खरडपट्टी काढली ..
सचिन रैना ने आपली फलंदाजी सावरली ..
आणि पाकड्यान समोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली ..
मोक्याच्या क्षणी भजी, मुनाफ, नेहरा, युवराज आणि झहीर ची गोलंदाची  बहरली ..
एक एक करून सगळ्या पाकिस्तानच्या फलंदाजांची दांडी गुल केली ..
क्षेत्र रक्षणची सुधा आपल्याला चांगली साथ लाभली..
पाकिस्तान  बरोबर विश्व चषकामध्ये कधीच नाही हरली ..
पाकड्यांना नेहमीप्रमाणे घरची वाट दाखवली ..
अन भारताने आपली शान राखली..
अन विश्व चषकाची फायनल गाठली ..
आता विश्व चषक जिंकण्याची उत्कंठा वाढली ..
आता विश्व चषक भारताचाच याची
खात्री सुद्धा मनाला पटली...
कारण एक एक करून सगळ्याच दिग्गज संघांना
भारताने धूळ चारली .. 


आता फायनल मध्ये करा लंका दहनाची तयारी..
योगायोगाने हा सामना आहे शनिवारी..
राम आणि रावण एकमेकांसमोर
जगाची हि रीतच आहे न्यारी ...
टीम इंडियाचा २८ वर्ष वनवास झाला भारी ..
बोलतात ना इतिहासाची पुनरावृत्ती होते कधीतरी..
आता पुन्हा एकदा लंका दहनाची आहे आमची पूर्ण तयारी..
नक्की पाठवू लंकेला पुन्हा एकदा माघारी...

 रामायण - २ begins.....शनिवार दुपारी २.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत..
 साभार - कवी : राहुल बाजी 
गाव .............रसायनी, रायगड..

Post a Comment Blogger

 
Top