मुलींनो हा लेख तुमच्यासाठी आहे. मुलाला पटवण्यासाठी फक्त दिसणं चांगलं
असतं असं नाही. त्याहीपलीकडे जाऊन काही तरी हवे. मग मुले मुलींमध्ये
पहातात तरी काय? ते खाली वाचा.



१. व्यक्तिमत्व
ज्या मुलींना चागंली पर्सनॅलिटी असते, त्या मुलांना नेहमीच आवडतात.
लक्षात ठेवा पर्सनॅलिटी म्हणजे दिसणं नव्हे. रंगापेक्षाही त्यात
स्मार्टनेस अपेक्षित आहे.

२. विनोदाचा 'सेन्स'
महिलांना विनोदाचा सेन्स नसतो, असं म्हणतात. कदाचित म्हणूनच पुरूष
महिलांची टर उडवत असावेत. पण लक्षात ठेवा, ज्या महिलांना विनोदाचा सेन्स
असतो, त्या पुरूषांना आवडतात.

३. प्रामाणिक
मुलांना प्रामाणिक मुली आवडतात. याच्याबरोबर राहून त्याला डोळे
मारणार्‍या मुली त्यांना अजिबात आवडत नाहीत.

४. उगाच चिकटूपणा नको
उगाचच आपल्याला चिकटणार्‍या मुली मुलांना अजिबात आवडत नाहीत.

५. बुद्धिमान
बुद्धिमान मुली मुलांना नक्कीच आवडतात.

६. प्रेमळ, दयाळू आणि सौंदर्य
हे तिन्ही घटक मुलांवर नक्कीच प्रभाव पाडतात. पण सौंदर्याबरोबरच हे
दोन्ही घटकही असावेत.

७. आकर्षकपणा, फिगर, गंमत्या स्वभाव
तुमच्यात आकर्षकपणा तर हवाच. तो फिगरमधूनही जाणवायला हवा. शिवाय स्वभाव
हसतमुख असल्यास तुम्ही नक्कीच मुलांवर प्रभाव पाडू शकतात.

८. सच्चेपणा
मुलांना मुलींमधला सच्चेपणा आवडतो. खोटारडेपणा करणार्‍या मुली त्यांना
अजिबात आवडत नाहीत.

९. सातत्य
प्रेमात सातत्य हवे. अन्यथा आज हा उद्या तो असला उच्छृंखलपणा मुलांना आवडत नाही.

१०. नीटनेटकेपणा
आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. स्वच्छता पाळणार्‍या मुली मुलांवर नक्कीच
प्रभाव टाकतात. नीटनेटकेपणा असेल तर तो प्रभावी ठरतो.



आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top