G - TALK वर माझ्या असा एक ping आला
भटकलेल्या वाटसरूला जसा नवा रस्ता मिळाला...


तास न तास वाट ती ONLINE येण्याची पाहायचो
तिच्याशी गप्पा मारताना वेगळ्याच दुनियेत मी जायचो...


महत्वाची कामे सारी बाजूला सरायची
सखी ONLINE आली कि शब्दांचीही कविता बनायची...


ऑफिसात धाव माझी तिच्याशी CHAT करण्यास असायची
ऑफिसच्या कामांना कसली हो घाई असायची...


दुखाची ओझी सारी कधी न जड वाटायची..
तिच्याशी ONLINE बोलताना हास्याची कळी गाली उमलायची...तिला SMILEYS पाठवताना हुरहूर मनाला लागायची
वेडे मन माझे तिच्या SMILEY ची आतुरतेने वाट पहायची...६ चे ठोके पडताच तिच्या OFFLINE जाण्याची भीती असायची...
रात्र तिच्याच विचारात घालवत ती ONLINE येण्याची वाट पहायची...कधी ही न पाहिलेल्या व्यक्तीवर अशी प्रीत जडावी...
अशी ONLINE सखी अचानक काळजाला भिडावी...INTERNET या अशी जादूची छडी फिरवली
स्वप्नांच्या दुनियेतील तिच्याशी ONLINE भेट घडवली...सौंदर्यावर भूळूनी प्रेम करणारे..प्रेमी असे खूप आहे..
पण ONLINE प्रेम करणारा प्रेमी मात्र मीच आहे...प्रेमी मात्र मीच आहे...
 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top