एक मुलगी एक मुलगी होती म्हणायची मला मंद,
पण माझ्या कविता वाचणे हा होता तिचा छंद.

मंद म्हणायची, चंपक म्हणायची आणि म्हणायची वेडा,
कानाखाली आवाज काढेल ती, अगर किसीने उसको छेडा.

मी म्हणायचो तीला मुल कशी असतात सांग,
ती म्हणते त्यांच्या नानाची टांग.

शब्दात सांगता येणार नाही असे आमचे नाते,
गाणं म्हणायला सांगितल्यावर म्हणते मी कुठे गाते.

ती बरोबर असताना मला नाही येत झोप,
ती मला आवडायची, जस्ट आय होप.

तिच्यावर कविता लिहिताना आठवली मला माझी अधुरी भेट आपली,
आणि पुन्हा एकदा पाणी होऊन माझ्या डोळ्यात दाटली.

ती ओंनलाईन यायची मी बघायचो वाट,
इतरांपेक्षा वेगळी होती, वेगळाच तिचा थाट.

एकेदिवशी गप्पा मारत बसलो मला झालं लेट,
कधी झोपलो, सकाळ झाली चालूच राहिलं नेट.

वाटत होत तीला एकदा तरी पहाव,
मैत्रीच्या रिंगणात असंच फिरत रहावं.

साभार - कवी: विशाल गावडे.

Post a Comment Blogger

 
Top