आयुष्य वेचत चाललो आहे, आठवणीत तुझ्या,
कसे सरतिल सये दिवस माझे विरहात तुझ्या....

दिवस उजाड़तो, तो ही आठवणीत तुझ्या,
मावळल्या सर्व आशा,विरहात तुझ्या....

न सांगताच ऐकु आले होते शब्‍द मनातिल तुझ्या,.
ओठ माझे आता अबोल झाले आहेत, विरहात तुझ्या...

किती ते क्षण मी साठवले, आठवणीत तुझ्या,
ओंजळ माझी रिकामीच शेवटी, विरहात तुझ्या...

स्वतःचाही विसर पड़ला होता मला, आठवणीत तुझ्या,
पण तोच मूर्खपणा आठवतोय आता, विरहात तुझ्या......

साभार - कवी : प्रथमेश राउत.....

Post a Comment Blogger

 
Top