हाच तो किनारा आणि हाच तो समुद्र,

हाच तो किनारा, ज्याच्या साक्षिणं तू मला सोडून न जाण्याच्या आणाभाका घेतल्यास,
हाच तो समुद्र, ज्याच्या साक्षिणं तू माझीच बाकि कोणाचीच नाहीस याचं आश्वासन दिलंस.

हाच तो किनारा, ज्याच्या वाळूवर आपण एकमेकांची नावं कोरत होतो,
हाच तो समुद्र, ज्याच्या काठाशी बसून अखंड एकमेकांच्या प्रेमात वाहत होतो.

हाच तो किनारा, तिथे तू तुझं सर्वस्व मला अर्पण केलंस,
हाच तो समुद्र, ज्याच्या लाटांवर स्वार होण्यास तू मला आतुर केलस.

हाच तो किनारा, जिथे प्रथमच मी तुला मिठीत घेतलं,
हाच तो समुद्र, तिथे तू माझ्या जवळ येउन मला आपलसं केलंस.

कसं काय विसरलीस गं हे सगलं,
की तुला काहीच आठवत नाही.

आज फक्त फरक एवढाच आहे, जो शेवटच्या ओळीतून माझ्या काळजावर अलगद पण घटक वार करुन गेला  !!!!!!! 

हाच तो किनारा, आणि हाच तो समुद्र,
पण जिथे कोणीच नाही ???????

आहे फक्त मी एकटाच,
तुझ्याविना तुझ्या प्रेमाविना????

साभार-कवी :...... प्रथमेश राउत......

Post a Comment Blogger

 
Top