तुझे ते माझ्याशी हसत हसत बोलणे नि
बोलता बोलता लाडिक हसणे
मला मुळी कळतच नाहीत..तुझे हे सारे बहाणे

नजरेला माझ्या नजर देऊन
हळुच लाजत नजर फिरवणे
आणि मानेला एक झटका देत
माझ्या कडे हळुच तिरपी नजर करुन पहाणे
मला मुळी कळतच नाहीत.. तुझे हे सारे बहाणे...

 
चेह-यावर येऊ पहाणा-या बटांना सावरणे
सावरलेली बट परत उगाच
नाजुक लांबसडक बोटात फिरवणे,
आणि परत ही चेह-यावर आणणे,
मला मुळी कळतच नाहीत.. तुझे हे सारे बहाणे..

 
 
हळुच मग ओठांवर सुहास्य स्मित आणुन्
डोळ्यांच्या कोप-यातून माझ्याकडे लाज़ुन् बघणे..
खरच सांगतो ग,खल्लास करुन टाकते
तुझे असे वागणे..
मला मुळी कळतच नाही.. तुझे हे सारे बहाणे..


पण हव्याहव्या वाटणा-या पावसाच्या
तुषारांकडे त्रासून तुझे पहाणे.
नी लगबगीने चालता चालता मागे वळून पाहणे
डोळ्यातले पाणी..पावसासंगे लगेच वाहून घेणे
पाणावतात मग माझे ही डोळे
तुझे माझ्याकडे असे पाहणे ....
जीव घेऊन जातो ग माझा
तुझे हे असे वागणे..

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top