काल जेव्हा तू अचानक फ़ोन केलास...
काल जेव्हा तू अचानक फ़ोन केलास...
कशी आहेस म्हणालास...
मी काय बोलणार होते...
खर कस सांगणार होते..
मग म्हणाले मी मजेत आहे रे...
ते जाऊ दे तुझ कस चाललय रे..
तू म्हणालास मी ही बिंदास्त आहे..
आजकाल कामात जरा जास्तच व्यस्त आहे..
मग बराच वेळ आपण बोलत होतो...
घरच्यान बद्दल, ऑफिस बद्दल,
नविन पाहिलेल्या सिनेमा बद्दल...
अगदी पूर्वी सारख हसत हसत...
एकमेकांना चिडवत होतो...
मनात चाललेले वादल,
कसे बसे डोळ्यात थाम्बवत होतो...
एकमेकांच्या मनाची,
हळूच चाहुल घेत होतो..
तूझा कातर झालेला आवाज
आणि तोलून मापून बोलण..
मी कशी आहे याचा
हळूच कानोसा घेन..
दोघांनाही ठाउक होत
आपण वर वरच हसतोय..
समोरच्याला कलु नये..
म्हणुन नाटक करतोय..
मग मधेच थाम्ब्लास,
थोड्या वेळाने म्हणालास..
लग्नाची तारीख ठरली..
हॉल ठरला सगळी तयारी झाली..
अजुन ही बरीच काम पेंडिंग आहेत..
पण घरचे सगले खुश आहेत..
मग हळूच म्हणालास येशील न,
माझ्यासाठी दिवस तूझा राखशील न?
मी म्हणाले नक्कीच येइन,
इयर एंड आहे पण प्रयत्न तरी करीन
मग कधीतरी तू फ़ोन ठेउन दिलास,
आणि पुन्हा एकदा माणसांच्या  गर्दित,
मला एकट करून गेलास...

काल जेव्हा तू अचानक फ़ोन केलास... 


 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top