फ़क्त एकदाच तुला
मिठीत घ्यायच आहे
निदान त्यासाठी तरी...
थंड गार हवा बनुन वहायच आहे...

फ़क्त एकदाच तुझ्या
मऊशार केसांतून हळूवार हात फ़िरवायचायं
निदान त्यासाठी तरी...
एखादा गजरा तुझ्या केसांत घालायचायं...
फ़क्त एकदाच तिला
मनसोक्त हसताना पहायचे आहे
निदान त्यासाठी तरी
...
मला जोकर बनुन तिच्या समोर यायचे आहे ...
 फ़क्त एकदाच तिच्या
मनातले सारे काही जाणून घ्यायचे आहे
निदान त्यासाठी तरी...
नजरेला नजर भिडवून तासन तास बसायचे आहे...
 फ़क्त एकदाच तिला
रागावलेल पहायचे आहे
निदान त्यासाठी तरी...
ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा जायचे आहे...

फ़क्त एकदाच तिला
खुप आनंदीत बघायचे आहे
त्यासाठी तरी निदान मला...
पास व्हायचे आहे ...

फ़क्त एकदाच माझ्यासाठी
बेभान होउन रडताना पहायचे आहे
निदान त्यासाठी एकदातरी...
खोटे खोटे मरायचे आहे...

Post a Comment Blogger

 
Top