मागितली तिने मला लिफ्ट....
काय कराव, काय कराव म्हणतच
मागची बैग केली पुढे शिफ्ट.....

उफ.....! काय सांगू मित्रा..... ओह्ह.......!
पोरगी धमाल..... नजर कमाल
झाल....! माझ नशीबच मालामाल........

कुठ जायचंय........?
जरा रुबाबातच विचारलं मी......
इथे जवळच पुढच्या गावात.....!
गोड आवाजात म्हणाली ती........

सावरून- सवरूनच बसली ती माझ्या मागे
जरा खुशीतच निघाली आमची सवारी.......
वरून थोड अवघडल्या सारख पण..?
मनातून वाटत होत लय लय भारी......

मित्रा खर सांगू ,,,,,
माझा इरादा खरच नेक होता....
पण काय करू.... रस्ता खराब....?
त्यामुळे ब्रेक सारखा लागत होता.....

तिचा मनमोहक सुंगधी स्पर्श
मन भुलवून गेला.....
क्षणभरच का होईना पण
आनंदाचे झोके झुलवून गेला......

झाल....! क्षणिक सुखाचा बुडबुडा
फटकन फुटला.....
तिचा येणारा थांबा
जरा लवकरच येवून टेकला.....

थोड्या हाय ! हेल्लो ! नंतर हसून म्हणाली
Thanx For लिफ्ट........
थोडा नर्वसच मी...शेवटी हसून मी पण
केली पुढची बैग मागे शिफ्ट...... :-DPost a Comment Blogger

 
Top