प्‍लीज गॉड.गिव्‍ह मी अ ब्रेक,किंवा देवा,उचल रे बाब‍ा, असे उदगार ब-याच जणांच्‍या तोंडून आपण अनेकदा ऐकतो, सगळं काही अगदी रूळावरून धावणा-या रेल्‍वेप्रमाणे सुरळीत चालू असतं. पण का कुणास ठाऊक जगण्‍याचाच कंटाळा यायला लागतो. मनात अनेक प्रश्‍नांची उत्‍तरे....
. पैसाच हवा पण कशाला, पैसे कमवायचे तर धावावच लागतं. पण पैसा पैसा करताना जगणं हातातून सुटत चाललंय, त्‍यांचं काय करायचं,''पैसा वाईट आहे'' असं म्‍हणणंच मुळात चूक. आपण आपली तत्‍वच चुकीच्‍या जागी ठेवता आणि तत्‍वापेक्षा पैसा श्रेष्‍ठ मानता . याला जबाबबदार आहे सतत होणारं ब्रेन वॉशिंग.      सतत एकच मारा आल्‍यावर होतो, ''पैसा हवाच'', खूप धनदौलत असायला हवी, तिचा उपभोग घ्‍यायला हवा. ''बुई वॉंट मोअर'' पण कशासाठी याचाच विचार आपण करत नाही.
      खरं तर माणासांना हवी असते माणुसकी,  पण आपण माणसं जोडण्‍यापेक्षा वस्‍तूचे पर्याय शोधत बसतो.  पण या वस्‍तू आपल्‍यावर प्रेम करू शकत नाहीत.  कितीही संपत्‍ती गोळा केली तरी आपल्‍या पाठीवर प्रेमाची थाप मारण्‍यासाठी माणसंच लागतात. आपल्‍याला काय हवं आणि आपली नेमकी गरज काय यातलं कन्‍फयुजनच सगळया असमाधानकारकतेचं कारण आहे. भूक लागल्‍यावर जेवायचं सोडून दुसरा काय खात आहे याकडे आपले लक्ष जास्‍त. मग एकामागून ऐक अशा गरजा वाढतच जातात. दिल्‍याने वाढतं असं म्‍हणतात .मग कुणाला पैसे देण्‍याऐवजी वेळ द्या आणि पहा, खरंच तुमच्‍यासाठी त्‍यांचं प्रेम,  त्‍याची आपुलकी वाढेल...
          आजूबाजूंच्‍या माणासांना, त्‍यांच्‍या प्रश्‍नांना वेळ द्या. असं काही तरी करा जे तुमच्‍या जगण्‍याला एक अर्थ देईल. केवळ पैसा पाहून माणसं जोडलीतर मित्रच काय सच्‍चे शत्रूदेखील मिळणार नाहीत.
 आपण भावनेच्‍या भरात वाहून जातो. खूप भावूक होऊन निर्णय घेतो. काम कराताना अपयशची भीती, जगताना सतत होणा-या यातनांचं दुःख काय करायचं या सगळयाचं ''डिटॅच युवरसेल्‍फ'' हे साधं, सोपं तंत्र वापरलं तर या भावनाच आपल्‍यातला ओलावा जागा ठेवतात. सुखकारक भावना हव्‍यात आणि वेदनांच्‍या झळा नको असं शक्‍य नाही. जे काय जगायचं, अनुभवायचं ते पुरेपूर अनुभवा.
            वेळ हातातून निसटणा-या वाळूसारखा चाललाय, दिवस सरतायत, असेच वर्षेही संपतील पण जगायचं राहून गेलं तर करयचं काय, आयुष्‍य नावाची गोष्‍ट जगायला इतकी भयंकर आहे असं आपापल्‍या जीवन संघर्षाचे (स्‍ट्रगल) वर्णन करून आपण नेहमी सांगत आसतो. पण ज्‍यावेळी आपण मोठे होतो त्‍यावेळी आपण अधिक शिकतो हेच आपण विसरून जातो. आयुष्‍यभर आपण आहेत तेवढेच राहीलो. तर आपली अक्‍कलही तेवढीच राहील. वय वाढणं म्‍हणजे स्‍वताःला घडवत समृध्‍द होणं. मरणाच्‍या जवळ जाणं नसून जगायला शिकणं हो.
  आपण आहेत तेवढेच राहावं असं आल्‍याला वाटतं. त्‍याचं कारण म्‍हणजे असमाधान, अपुरेपण रोजच्‍या जगण्‍यातला अर्थच मुळात आपल्‍याला समजत नाही, अर्थपूर्ण जगता येत नाही. सतत वाटतं काही तरी करायचं राहिलं. म्‍हणून काळाच्‍या मांग जाऊन ते करावसं वाटंत. त्‍यापेक्षा सतत काही तरी करायची उर्मी, जिदद असेल तर पुढे जाण्‍यात रस वाढतो. मग काळ, वेळ यांच्‍याशी संबंधच उरत नाही. काही करायंचे नाही आणि सतत रडत राहायचं, सतत आपला वेळ वाया जाईल का याबददल तळमळत राहून वेळ जाणं थांबत नाही. म्‍हणून हे करायचं राहीलं किंवा ते करायला वेळच मिळाला नाही असं म्‍हणून नका. ते तातडीने करायला घ्‍या.
          नियम फक्‍त मोडू नका- नवीन नियम तयारही कराः समाजाचे सगळेच नियम मो्डीत काढण्‍यात कोणतंही शहाणपण नाही. असं करून आपण कोणतीही क्रांती घडवत नाही.
खरं तर समाज, संस्‍कृतीच्‍या छोटय छोटया गोष्‍टी आपण पाळायला हव्‍यात. मात्र मोठया गोष्‍टींची सूत्रे आपण आपल्‍याच हातात, ठेवायला हवीत. म्‍हणजे आपण कसा विचार करतो, आपण आपल्‍या जगण्‍यासाठी काय तत्‍व म्‍हणून स्‍वीकरतो हे आपण ठरवायला हवं. ते आल्‍यासाठी समाजाने ठरवणं मुळीच मान्‍य करू नये. आपल्‍या जगण्‍याची पध्‍दत आणि त्‍यातून आकार घेणारं कल्‍चर आपणच घडवायला हवं. ते समृध्‍द करायचं तर आपण तसंच जगायला हवं. कोणी तरी आपल्‍यासाठी जगून ते कल्‍चर जन्‍माला घालणार नाही. त्‍यासाठी आपण विचारांची शिस्‍त पाळून, चुकत असेल तर तेळीच सुधारणा करून स्‍वताःची जीवन पध्‍दती स्‍वतःच घडवायला हवी..

Post a Comment Blogger

 
Top