लग्नानंतर बघा कशी ही Life घेते पूर्ण Twist
कवितेच्याही वाहित सापडते, या महिन्याची किराणा लिस्ट..


लग्नानंतर रोज ऐकणे, "तू पूर्वीसारखा राहिला नाही"
तूही होतीस पूर्वीच सुंदर, फरक तिने हा पहिला नाही
सायंकाळी नियम्बद्धाशी, न चुकाणारी रोजची कटकट
दुर्लक्षितशी सुरु राहते, अखंड, अनंत सदैव वटवट


टोमणे झाले मित्र मला, घराणे झाले शिव्यान्ना जागा
उद्धरले तू सर्व कुळान्ना, अखेरीस मी तुलाच त्रागा...


नेहमीच माझी सत्व परीक्षा, परस्त्रीवरुनी अन् ऑफिसमध्ये
कोण राम अन कोण ही सीता, रामच जळतो अग्निमध्ये....तूच म्हणाली कर ना कविता, सख्या कधी तू माझ्या वर..
म्हणुन सांगतो ऐक प्रिये... आणि "जा चहा कर...!!!!" Post a Comment Blogger

 
Top