एकदा का होईना मला
तुझ्याशी प्रेम करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा
फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहेतुझा तो सुंदर चेहरा
जणू जास्वंदी सोबत मोगरा
तुझे ते सोणेरी रूप
जसे साखरेत मुरलेले तुप
त्यातल प्रत्येक स्वाद
मलाच चाखायचा आहे
एकदा का होईना मला
तुझ्याशी प्रेम करायचय आहे

तुझे ते लांब रेशमी केस
हलकेच हवेत उडत
तुला झुल्यात बसवण्यासाठी
मन माझे तडपडत
त्या स्वप्नाच्या झुल्यात
मला पण झुलायचे आहे
एकदा का होईना मला
तुझ्याशी प्रेम करायचय आहे

तु जवळून माझ्या जाताना
येत असे सुगंधी वारा
मनात माझ्या बरसे
जणू पावसाच्या धारा
त्या सुगंधी पावसात
तुझ्याच बरोबर भिजायच आहे
एकदा का होईना मला
तुझ्याशी प्रेम करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा
फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहे 


Post a Comment Blogger

 
Top