मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायचीगजावर झुकलेल्या रातराणीसारखी
नजर तुझी झुकायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!!निंबोणीच्या झाडामागचा
चंद्रही गालात हसायचा
आभाळातल्या ढगालाही गुपित तुझ सांगायचा
त्याच्यावर उगी तू रागवायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!कळी कळी वेचतांना तू
फुलाच्या कानात बोलायची
मी कितीही विचारल तरी आम्ही नाही जा म्हणायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची ....!!
तुझ मात्र बर आहे,येण जाण ही सुरु आहे
मागे वळून पाहतांना काळीज तोडून नेण आहे
भुवई ऊडवत जायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!असे हे किती दिवस चालायच,मुकेपणातच बोलायच
सारे संकेत कळून सुध्दा न कळल्यागत करायच
अन डोळे मोठे करुन पाहायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!आता मात्र सोसत नाही,
दिवस काय पण रात्र ही तुझ्याशिवाय जात नाही
असं का व्हावं म्हणून विचारल तरी का ?लाच कारण नसत म्हणायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!! 
Post a Comment Blogger

 
Top