नाही भेटलो मी दिवसभर तर
तीने खुप बैचेन व्हावं
संध्याकाळी ऒफ़िसबाहेर भेटून
मला अगदि सरप्राईज द्यावभेटण्यासाठी ठरलेल्या जागी
तीने माझ्या आधी यावं
आणि मी उशिरा आलो म्हणुन
मग लटके लटकॆ रागवावंफ़िरताना जर मी नजरेआड झालो
तर तीने कावरबावरं व्हावं
आणि मी दिसल्यावर मात्र
अश्रू लपवत मला प्रेमान ओरडावंमाझं काही चुकलं तर
तीन कधीही न रागवावं
अबोला धरुन मला न रडवता
काय चुकलं ते समजवावं


जीची कल्पनाही केली इतकी
भरभरुन प्रेम देणारी ती व्यक्ती असावी
माझी आठवण आली तीला की
तिनंही माझ्यासाठी एक कविता लिहावी.


Post a Comment Blogger

 
Top