प्रेम कराव आभाळासारख
धरणिला समांतर असणार
सुखदु:खाच अंतर लांघुन
क्षितिजावर मिलन करणार

तु हसलीस की ..
मला हे जग माझं वाटत..
मग मलाही जगताना…
कस ताजं वाटतं…

कोरया कागदावर काय लिहायचं..
या विचाराने डोकं खाजवलं..
पण लेखनीने कागदावरचं प्रेम..
शब्दाच्या आधाराने अचुक सांगितलं

तुझं एक हसू तुझं सारं सौंदर्य
तुझ्या गालाच्या खळीत एकवटतं
मला मात्र ते एका क्शणात
कापरासारखं विरघळवतं

तुझा आधार
माझ्या जगण्याला..
निराधार झालेल्या
एकट्या चांदण्याला..

तुझ्या नाजूक् गालावरती
पावसाचा एक थेम्ब पडला,
तुझ्या प्रेमात इतका बुडला की
वहानच विसरुन बसला

माज़े काहि चुकत् नव्हते
तिचे वागने वावगे नव्हते,
ऐक् मात्र खर् कि
बरोबर् कहिच् येत् नव्हते!सगळ्या गोष्टी कशा
भराभर घडत गेल्या
मी प्रेमात पडलोय म्हणेपर्यंत
एकाकी कातरवेळा उठवायला आल्या

उगवणारी प्रत्येक सकाळ
नवी पालवी फ़ुलवते
मात्र मावळती संध्याकाळ
रीतेपणाची चाहुल देते

नेमका जो विषय टाळायचा
तोच आपण काढतॊ आणि
वादाच्या रुपाने का होईना
आपल्या भेटीला वेळ काढतो

एक चूक लपवताना
दुसरी चूक करावी लागते…
चुका करत करतच मग
अवघे आयुष्य जगावे लागते…


सुकलेली पाने गळतात ना
वारा सुटल्यावर
तशी तुझी स्वप्न पडतात
मी डोळे मिटल्यावर
—-

सुकलेली पाने गळतात ना
वारा सुटल्यावर
तशी काही स्वप्न पडतात
मी डोळे मिटल्यावर

आयुष्यातला प्रत्येक क्षण
नव रूप घेऊन येतो
आणि जाताना तुम्हा आम्हालाही
नकळत बदलून जातो

काळ खूप पळतो….
पण आठवण तशिच राहते…..
म्रुगजळातील पाणी जसे..
फ़क्त दिसायला वाहते…..

इथे प्रत्येकजण आप आपल्या घरात,
अन् प्रत्येकाच दार बंद आहे
तरी एकोप्यावर बोलनं हा
प्रत्येकाचा छंद आहे.

पाउस पडला की मनाला
मनापासुन भीजावस वाटत
शबदानाही मनात मन्ग
कवीतेसाटी रुझावस वाटत

ओठान्पर्यन्त आलेले शब्द
मी मोठ्या कष्टानी मागे वळवले
पण डोळेच असे चुकार की
बोलायच ते बोलून गेले

प्रेमाच्या वाटेवर तीचे पाऊल
कधी वळलेच नाही
कितीही यत्न केले तरीही
माझे मन तीला कळलेच नाही

“वादळाच्या कुशीतून मी
आताच उठून आलो आहे
गालावरच्या पावसाला एक
वाट करून आलो आहे”

“कायम स्वप्न पहावीत,
त्यामधे हावे ते पहाता येतं.
जागेपणी जमलं नाही तरी,
निदान झोपे मधे हवे तसे जगता येतं.”

लाटेच असत एकच उद्दिश्ट, कसही करुन किनर्याला गठाव,
किनार्याला नसेल का वाटत, कधी लाटेकडे धावाव,
कदाचित वाटत असुनही त्याला ते शक्य नसाव,
आधार द्यायच वचन त्याच जमिनिशी पक्क असाव.

जेव्हा नशिबाने सोडली साथ
तेव्हाच “जवळचे कोण” याचा अर्थ समजला,
आणि जवळचे असावेच कोणीतरी
असे लोक का म्हणतात त्याचा उलगडा झाला !!!

कालचा पाऊस असा बेभान होऊन बरसला…
मनसोक्त स्वच्छंद क्षितीजावर उतरला
सगळ्यांना वेड लावत मॄद-गंध दरवळला
रोमारोमांतून नसानसांतून वसंत मोहोरला

माझ्या समोर उत्तराच्या अपेक्षेत असलेल्या
त्या प्रश्नचिन्हा समोर प्रश्नचिन्ह उभे राहिले…,
मला कोड्यात टाकण्याच्या नादात
ते स्वतःच एक कोडे बनून राहिले…

उंबरठ्यावरच्या मरणाला पाहून
त्याला ‘सुस्वागतम’ म्हणून हटकलं…,
मरणाहूनही हे थरारक जीवन पाहून
त्याचं पाऊल त्याच्याच पायात अटकलं…

मला काही कळत नाही
तू अशी का वागतेस …,
अळवाच्या पानाप्रमाणे या थेंबाशी
अशी अलिप्त का राहतेस…?

आज तू नसलीस तरी
मनात माझ्या आठवणींची हिरवळ आहे…,
तू क्षितिज पार करून येत आहेस
असे डोळ्यांसमोर एक म्रुगजळ आहे…

आपल्यावर हक्क दाखविणारं
असं कुनीतरी असावं…,
भरकटलेल्या पाखराला सावरणारं
असं एखादं घरटं असावं..

आज तुला पाहून
पुन्हा माझं मन भरून आलं..,
ह्रदयातलं आठवणींच हिम
डोळ्यांना गारवा देऊन वाहिलं…

शेवटचा दम उरलेली हि सिगरेट
जणू काही माझी माफी मागून जाते..,
“माझी साथ इथपर्यंतच आत पुन्हा तु एकटाच”
असच काहीस सांगून जाते…

पावलांची ठेच तर नेहमीचीच,
पण आज मन ही डगमगलं होतं….
निखळ चंद्राची प्रतिक्षा करित तेही,
निरस चांदण्यात् भरकटलं होतं…….!

आजचा हा दिवस चिंब पाऊस घेऊन आला,
मनाच्या सप्तसुरात आपल्या मैत्रीचा सुर गवसला….
मी ही संभ्रमात हा पाऊस का इतका रडतोय?
आठवणींचे अश्रु का मैत्रीचे आनंदाश्रु वाहतोय………!

मन तुझ्यात इतकं गुंतलय की,
विरहात आठवणींच गाव फुलतं..,
एखाद्याला साद घालायचीच म्हटलं
तर ओठांवर तुझंच नाव रुळतं…

दुःख अनावर झालं की
ढग आसवं गाळतात…
पाऊस आला म्हणत लोक
त्याचं दुःख टाळतात…

तसं पाहिलं तर
तुझ्या आठवणी थोड्याच आहेत..,
बराच काळ लोटला
मात्र आजही त्या ओल्याच आहेत…

तात्काळ एखाद्यावर विश्वास ठेवणे
या गोष्टिवर माझा राग आहे..,
मी संशयी बनलो
हा तुझ्याच उपकाराचा एक भाग आहे…

कितीही ठरवलं तरी
तुझ्यावरून रूसून राहता येत नाही..,
उघड्या डोळ्यांनी तुला टाळलं तरी
मिटल्यावर त्यांना तुझ्याशिवाय पर्यायच उरत नाही…

आज घर सोडताना
कहीच का वाटत नाही,
कोरड्या या डोळ्य़ात
पाणी का डाटत नाही.

ह्रदयातील ठोक्यांची धडपड
मला जगविण्याचा प्रयत्न करीत होती..,
मात्र ह्रदयात सलणारी तिची वेदना
या ठोक्यांची तक्रार करीत होती…

भीरभिरनरि नजर थरथरनारे ओठ,
नजरानजर होताच माति उकरनारे बोट !
आणि गालावर तिच्या गुलाबि साय असते,
याहुन वेगळे सान्ग मिञा प्रेम म्हणजे काय असते…

त्या काही सुप्त इच्छा
आजही अत्रुप्तच आहेत..,
व्यक्त केलेल्या त्या काही भावना
आजही तशा गुप्तच आहेत…

जीवणाच्या तराजूवर
सुख-दुःखाचं तोलणं आहे..,
नशीबाने मांडलेलं
हे मोजमापाचं खेळणं आहे…

न बोलताही ती
बरच काही बोलून गेली..,
घनदाट या काटेरी जंगलात
एक पाऊलवाट दाखवून गेली…

तुझ्या माझ्या नात्याची
चारोळी कशी लिहायची..,
तीन ओळी कशातरी लिहिन,
पण चौथीत ओली जखम कशी लिहायची???

तुझी आठवण हा
नित्य नवा अनुभव आहे
कधी उसळणारं वादळ
तर कधी पाकळीवरचं दंव आहे.

दूर-दूर तो
सागरी किनारा
गर्जतो मनात
वादळ वारा

रडू कशाला मी ??
त्याने काय साद्य होणार आहे ??
आणि कोणासमोर रडू मी
इथे प्रत्येकाचा रुमाल ओला आहे.

तुझ्यासाठी रोजच मी
चारोळी लिह्ण्याचं ठरवतो
पण तुझी आठवण येते
आणि हातच लिहायचा थांबतो…!

मेणबत्ती जळताना
काही मेण खाली राहते.
आयुष्य सरताना
आठवणीन्चेच ओझे उरते.

********************
माणूस किती हि दुर गेला तरी हि जवळ असतो,
क्षितिजाच्या पलिकडे असला तरी हि नजरेत असतो,
विचारात मतभेद असले तरी शब्दात गोडवा असतो,
मनात किती हि राग असला तरी हि मनात असतो.

********************

आठवणींच्या देशात मी
मनाला कधी पाठवत नाही
कारण जातांना ते खुश असतं
पण येतांना त्याला येववत नाही

********************

कधी कधी त्या क्षणाची वाट बघन्यात काहिच अर्थ नसतो,
त्या उद्यासाठी आपला आजचा क्षण व्यर्थ जातो,
डूबनारा सुर्य, उगवनारया सुर्यासारखाच सुन्दर दिसतो,
फरक एवढाच असतो कि सुर्य उगवताना आपण झोपेत असतो.

Post a Comment Blogger

 
Top