सांगू तुला कसे
शब्दही सुचेना
न सांगताच सारे
समजेल का तुला

बोलायचे खुप आहे
शब्द जुळत नाही
अवचित होणाऱ्या भेटीत
वेळ पुरत नाही

अवघड आहे सांगणं
तुच समजुन घे ना
वाच माझ्या मनातलं
देऊन नजर नजरेला

कधीकधी विचार करतो
सांगू तुला कशाला
कळेलच तुला
भाव माझ्या मनातला

प्रश्न न विचारता
उत्तर मला देशील का
माझे प्रेम समजल्यावर
होकार देशील का?

Post a Comment Blogger

 
Top