दोघं एकाच शाळेत आणि मग एकाच कॉलेज मधे होते. इतक्या वर्षांची छान मैत्री होती दोघांची.

ती - दिसायला अतिशय सुंदर, सतत बोलणारी, सतत हसणारी, खूप हुषार.
तो - अतिशय साधा, गप्प-गप्प राहणारा, अगदी चार-चौघांसारखा.
सतत बरोबर असायचे दोघं - अभ्यास, खेळ, सिनेमा, पिकनिक, टाइम-पास - काहीही असो - ना ती कधी त्याला बोलवायला विसरायची, ना तो कधी तिला सोडुन कुठे जायचा.. खरं म्हणजे ती त्याला हक्कानेच बोलवायची.. आणि त्याला तिला सोडुन कुठे एकटं जाणं शक्यच नव्हतं..


"अरे! आज मला युनिव्हरसिटीत थोडं काम आहे. येतोस का बरोबर?"
असा नुसता तिचा फोन आला.. आणि तो जेवण अर्धवट सोडुन तसाच बाईक घेऊन तिच्या घरी पोचला.
त्याची आई म्हणतच राहिली त्याच्या पाठीमागे, "अरे, निदान जेवण तरी संपव..." पण त्याला कुठे भान होता...
बाईकवर ती नेहमी त्याच्याच मागे बसायची. आणि तो ही दुसऱ्या कुठल्या मैत्रिणीला मागे बसु द्यायचा नाही.
ती दमली असेल तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायची. तीचे केस वाऱ्यानी उडायचे, हलकेच त्याच्या गालवर बसुन त्याला गुदगुली व्हायची.
लहानपणापासुनच दोघं एकत्र असल्याने दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं.


तिचं एक स्वप्न होतं - तिला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल हवं होतं. त्या करता ती मेहनतही तशी घेत होती. तास न तास अभ्यास करत होती. सोबतीला तो बसुन रहायचा. तिला झोप येऊ नये, तिचं concentration राहावं म्हणुन रात्री तिला तिची आवडती कॉफी करुन द्यायचा. तिचा वेळ नको वाया जायला म्हणुन तिच्या करता नोट्स, पेपर्स झेरॉक्स करुन आणायचा.
परीक्षा झाली. निकाल लागले. त्याला फर्स्ट क्लास मिळाला. त्याच्या करता तो खरं जास्तीच होता.
आणि ती? तिचं स्वप्न पूर्ण झालं. तिला गोल्ड मेडल मिळालं.


त्या दिवशी संध्याकाळी ती भेटली त्याला.
हातात एक लाल गुलाबाचं फुल होतं तिच्या.
तो प्रचंड खुष होता - फर्स्ट क्लास करता नाही, तर तिला गोल्ड मेडल मिळालं म्हणुन.


"आज मी खूप खुष आहे. एक गंमत झाली.
तुला विनय आठवतोय? दादाचा बेस्ट फ्रेंड? अमेरीकेला असतो गेले २ वर्ष.
परवाच आला तो १५ दिवसांकरता.
आज त्याला कळलं माझ्या रिझल्ट बद्दल. म्हणुन हे गुलाब घेऊन आला मला congratulate करायला.
आणि त्यानी मला चक्क प्रपोज केलं!!
म्हणजे पूर्वी तो इथे असताना माझा क्रश होताच त्याच्यावर. पण मला कधी वाटलं नव्हतं की आपलं त्याच्यावर प्रेम असलं तरी तो माझ्याकडे बघेल म्हणुन!
मला म्हट्ला की अमेरीकेला मला पुढचं शिकता येईल.
आई-बाबांना सुद्धा तो पटला. त्यांनी पण लगेच हो सांगीतलं.
येत्या रविवारी साखरपुडा आहे. त्याला लवकर परत जायचं आहे ना...म्हट्लं तुला येऊन आधी सांगते.
तुला पण कोणी आवडत असेल, तर तु मलाच पहिलं सांगशील ना?"तो गप्प राहिला... नेहमी सारखा.. नुसतंच "हं" केलं..
तिचं लक्ष नव्हतंच नाहीतरी.. ती त्या गुलाबाकडेच बघत होती..

-----------

"शेखर, क्या तुमने कभी किसी लडकी से प्यार किया हैं?"
"हां! हैं एक लडकी, बिलकुल तुम्हारे जैसी, बहुत सुंदर, बहुत भोली.. और थोडी पागल भी.. लेकिन मेरे प्यार की खबर सिर्फ मेरे दिल को हैं.."
"उसे बताया क्यों नहीं?"
"यह प्यार भी बडी अजीब चीज़ हैं संजना.. जहां इकरार की पुरी उम्मीद हो, वहां भी यह दिल कहने से डरता हैं..और मुझे तो इनकार क पूरा यकीन हैं.. अब, तुमही कहो.. वह किसी और को चाहती हैं.. बहुत चाहती हैं.."

जब किसी की तरफ दिल झुकने लगे
"Jab Kisi Ki Taraf Dil Jhukne Lage"
Watch this videoएक छान गाणं खूप, खूप दिवसांनी ऐकलं.. त्यावरुन ही गोष्ट...  :)

 

Post a Comment Blogger

 
Top