दिवसा स्वप्ने बघतो मी...

अजब 
दिवसा स्वप्ने बघतो मी
रात्री जागत बसतो मी...

उगाच कविता करतो मी
जगात वेडा ठरतो मी...

मनात इमले रचतो मी
आशेवरती जगतो मी...

असतो तेथे नसतो मी
मलाच शोधत बसतो मी...

वरवर नुसते हसतो मी
'अजब' मनाशी कुढतो मी...

Post a Comment Blogger

 
Top