का कोणी आपल्याला इतके आवडावे,
त्याच्यासाठीच वाटावे जगावे वा मरावे?...

कधि वाटते आपण नेहेमी स्वत: साठीच जगावे,
कशाला आठवणीत कुणाच्या उगीचच झुरावे?...

वाटते तसे आपल्याला कधीच जगता येत नाही,
आठवण तिची आल्यावाचुन दिवस एकही जात नाही...

प्रेम मनात मावेना म्हणून डोळ्यात माझ्या पाणी आलं,
तिने मात्र पटकन मला एक वेडा
म्हटलं...

हा मूर्खपणाच माझा की मी खूपच प्रेम करतो,
इच्छा नसूनही आठवनींवर रात्री सा-या जागुन काढतो...

Post a Comment Blogger

 
Top