तुझ्या ओठी माझे हास्य असावे
माझया डोळ्यात तुझे अश्रु असावे...!

सुखा मध्ये एकरुप व्हावे,
दु:खा मध्ये एकजीव व्हावे.!1

जीवनात विसाव्याचे
दोन क्षण असावे,
ते हि तुझ्या सोबतीत असावे..!२

डोळ्याचीं भाषा डोळ्यानां समजते,
तुझे स्वप्न मला हि दिसते,
ते साकारण्यात यश यावे...!३

तुझ्या इच्छा, तुझ्या आकांक्षा
प्रयन्तासाठी दहा ही दिशा,
एका दिशेत मी हि असावे....!4

तुझ्या ओठी
माझे हास्य असावे
माझ्या डोळ्यात
तुझे अश्रु असावे...!

Post a Comment Blogger

 
Top