आज "वैलेंटाइन डे" आहे
पण मला काही सुचतंच नाहीये,
मेसवाल्या काकुंनी गोड-धोड़ स्वयंपाक केलाय
पण मला काही रुचतंच नाहीये...

"वैलेंटाइन" नाही कुणी जवळ
मग "डे" कसला साजरा करायचा,
उगाच तिची भेट नाही झाली
तर दिवस आपला ख़राब व्हायचा...

कुणी नसलेल्या तिची
आठवण मात्र येते,
काळे-कुट्ट दाटतात ढग
मन प्रेमवर्षावाची वाट पहाटे...

संध्याकाळी सहज आपलं
बागेत जावून बसावं,
"कसं हे प्रेम करतात..?"
म्हणुन गालातल्या गालात एकटेच हसावं...

दिवसभर मोबाइलची शांतता
कुणाचाही मेसेज नाही, कॉल नाही,
रात्र झाली, मी कशाला वाट पहु
आता मी मस्तपैकी झोपी जाई...

आज मला काही सुचतंच नाहीये
काही म्हणता, काही रुचतंच नाहीये...

http://mannmajhe.blogspot.com/

Post a Comment Blogger

 
Top