आपल्यालाही छानशी गर्लफ्रेण्ड असावी, चारचौघांत तिच्याबरोबर फिरता यावं (खरं म्हणजे मिरवता यायला हवं), असं आजच्या मुलांना हमखास वाटत असतं. (तुम्हाला नाही वाटत तसं? मग, काहीतरी गडबड आहे राव... असं आम्ही नाही हो इतर जण बोलतील ना! म्हणूनच तर आज मिसरुड फुटलेल्या प्रत्येक मुलाला असं वाटत असतं.) असो, तर नेमका मुद्दा काय, की आजकाल गर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्ड असणं मस्ट झालं आहे. 

अहो, असं वाटणं खूप सोपं आहे. पण, इम्प्लिमेण्ट कसं करणार हो? मुलींबरोबर फिरणं स्टेटस सिम्बॉल बनत असलं, तरी एखाद्या मुलीला प्रपोज करणं, तिच्याबद्दलच्या तुमच्या भावना तिच्याकडे व्यक्त करणं जरा... जरा काय फारच कठीण असतं. तुम्हीही अशाच अडचणीत सापडला आहात का? हो... तर मग वाचायलाच हव्यात या टिप्स. यामुळे तुमचं कठीण काम थोडं तरी सोपं होईल. 

एखाद्या मुलीला प्रपोज करणं, तुम्हाला वाटतं तितकं कठीण नाही हो. यासाठी फक्त तुमच्याकडे हवा आत्मविश्वास आणि समयसूचकता. योग्य वेळ बघून आपल्या भावना तिच्याकडे व्यक्त करा. 

टेक इट इझी : अजिबात घाबरू नका. ती मुलगी हो म्हणाली, तर काय मजाच मजा. पण नाही म्हणाली, तरी काही बिघडत नाही. तुमच्या आयुष्याचा द एण्ड झाला असं अजिबात समजू नका. सो, बी कूल. आपण प्रपोज केल्यावर ती कशी रिअॅक्ट करेल, अशी काळजी आताच करत बसू नका. ती खरंच तुम्हाला आवडते, तर विचारून मोकळे व्हा. नाहीतर र्नव्हस होऊन नकारात्मक विचार करत राहाल, तर... तर गाडी छुट जाएगी. 

बी कॉन्फिडण्ट : तुमची बॉडी लँग्वेज, बोलण्याची पद्धती, आय कॉण्टॅक्ट, तुमचा आवाज, हातांची हालचाल या सगळ्यातून तुमचा आत्मविश्वास दिसून येतो. तुम्ही जर नजरेला नजर न देता, हातांची चुळबूळ करत मुलीशी बोललात, तर तुम्ही रिजेक्ट झालात म्हणून समजाच. (अहो, मुलींना अशी घाबरट, आत्मविश्वास नसणारी, लाजाळू मुलं आवडत नाहीत ना.) 

स्माइल प्लीज : तुमचं स्मित हास्य तिला तुमच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नरच निर्माण करून देईल. पण, र्नव्हस न होता हसा. नाहीतर तुम्ही र्नव्हस आहात, हे दाखवणारं स्मित कराल. आरशात पाहून आधी या सगळ्याची प्रॅक्टिस करायला विसरू नका. जोपर्यंत आपल्या स्माइलवर तुमचा तुम्हालाच विश्वास वाटत नाही, तोपर्यंत प्रॅक्टिस सुरू राहू दे. 

मुद्द्याला हात घाला : इकडचं तिकडचं बोलत बसू नका. मुद्द्यावर यायलाच हवं. तुम्हाला तिच्याबद्दल नेमकं काय आणि का वाटतं, ते एकदाचं स्पष्टपणे तिला सांगून टाका. 

तुमचं बोलणं अर्थपूर्ण असायला हवं. पण, याचा अर्थ असा नाही, की तुम्ही राजकारणातील एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करू लागा. तिच्याबद्दल, तिच्या फ्रेण्ड सर्कल आदींबद्दल बोलता बोलता तुमचं मन तिच्याकडे मोकळं करता येईल. 

तिचं म्हणणं ऐकून घ्या : फक्त तुम्ही आणि तुम्हीच बोलत राहू नका. तिलाही बोलण्याची संधी द्या. तिचं तुमच्याबद्दल काय मत आहे, हे जाणून घ्या. तिच्याशी बोलताना तिच्या नजरेला नजर द्या. 

तुम्ही तिच्याकडून काय अपेक्षा करता, हे तुम्हीच तिला सांगून टाकलेलं बरं. ती स्वत: येऊन तुम्हाला तिचा मोबाइल नंबर देईल अशा अपेक्षा करणं व्यर्थ आहे. 

तुमचं हे बोलणं कधी ना कधी थांबवावं लागणारच. योग्य वेळी संवाद थांबवलेला बरा, नाहीतर उगीच पाल्हाळ लावत बसाल तर तुमच्याबद्दल तिच्या मनात पकाऊ अशी इमेज निर्माण होऊ शकते. 

सरतेशेवटी, महत्त्वाचं. तुमची स्वप्नसुंदरी तुम्हाला नाही म्हणाली म्हणून खचून जाऊ नका. तिच्याशिवाय जगात आणखी कोणी परफेक्ट नसणारच असं थोडीच. बी पॉझिटिव!!!Post a Comment Blogger

 
Top