आठवतं का तूला........

एकदा मी पावसात,
चींब भीजलो होतो,
ओढणीने मग तूझ्या,
तू माझं डोकं पुसलं होतं,
आठवतं का तूला ?

आपण जेव्हा सिनेमाला जायचो,
तू सिनेमा,
आणी मी तुझ्याकडे पहायचो,
आठवतं का तूला?

मला कुठे भेटायला यायचीस,
मी जवळ ओढावं म्हणुन,
दूर उभी रहायचीस,
आठवतं का तूला?

आपण चहा प्यायला जायचो,
दोघेही पैसे जमवुन,
चहाचे बील द्यायचो,
आठवतं का तूला?

ते झाड आपण जिथे भेटायचो,
ते ही उन्मळून पडलयं,
आपल्या प्रेमासारखं काही,
त्याच्या सोबत ही घडलयं,
आठवतं का तूला?

तूझ्या समोर आलो,
की माझी नजर ही टाळायचीस,
आपले दुरावलेले सबंध,
काटेकोरपणे पाळायचीस......

Post a Comment Blogger

 
Top