तु दिलेली कवितांची वही,
मी अजूनही जपुन ठेवलीये,
कधी कधी एकटं वाटत ना,
म्हणून…

प्रत्येक कवितेत तू मला,
कधी नव्याने भेटतेस,
पानवरील दंव,
नाजुकपणे वेचताना,

तर कधी निरगसपणे,
ता-यांशी गप्पा मारताना,
कधी मनाचे पंख विस्तारुन,
मोरप्रमाणे नाचताना,

तर कधी हळवी होउन,
माझ्या कुशीत शिरताना,
तुझ्या कवितेतली वादळं,
आता माझ्यात शिरत चाललीत,

तुझ्याशिवाय कुणी नाही म्हणून,
आतल्या आत विरत चाललीत,
अखेरीस देउन मला,
तुझा आसमंत विलक्षण,

भरभरुन जगवतेस पुन्हा,
आयुष्यातला तो एक क्षण!!!

Post a Comment Blogger

 
Top