शेवटी तु मला विसरलीसच
पण मी कसा विसरु तुला
कसा विसरु त्या जागवलेल्या रात्री
कशा विसरु त्या आगीच्या ज्वाळा
कशा विसरु त्या ह्रुदयातुन उठणाऱ्या कळा
प्रितीच्या बदल्यात प्रीत मी कधीच मागितली नव्हती
बस तु लग्नाला बोलावशील
अशी अपेक्षा मात्र मी केली होती
विश्वास ठेवला होता तुझ्यावर
पण तुही सामान्यच निघालीस
बस तुझ्या लग्नाला मी आलो असतो
कोपऱ्यात उभा राहुन डोळाभर पाहिलं असतं
लग्नानंतर पोटाला तडस
लागेपर्यंत जेवलो असतो
तुझ्या वरातीत
धुंद होउन नाचलो असतो.
पण तु मात्र माझ्यावरच संशय घेतलास
माझी प्रीत इतकी का कमजोर होती?
आता मी तुला विसरणार आहे
आज ना उद्या मी तुला विसरीन
आतापर्यंत मी स्वतःला
तुझ्या लायक समजत नव्हतो
आतामात्र मला कळून चुकलय
तुच लायक नाहीयेस माझ्या प्रीतीच्या
मी फ़क्त खाली पडलोय
मोडुन पडलो नाहीय
मी पुन्हा उभा राहीन
पण तुझ्यासाठी नाही
ज्याच्यांवर कविता तयार होतात
त्या व्यक्ती नशीबवान असतात
आज तु कमनशीबी ठरलीस
कारण ही कविता नाहीये
हे माझे अश्रू आहेत. शेवटचे अश्रू

Post a Comment Blogger

 
Top