एक चांगली गोष्ट झाली होती जगुन,
आपण एकमेकांना ह्या जगात भेटलो...
दिलेस तू प्रत्येक क्षण आनंदाने भरून ,
तुझ्या प्रेमळ डोळ्यात फ़क्त मीच दिसलो...

खुप-खुप मजा केली दोखानी मिळून,
प्रत्येक वेळेस मी मनापासून हसलो...
मागील काही दुखत गोष्टीना विसरून..
मी आत मध्येच खुपच रडलो...

ह्या जगात मी एकटा राहून,
तुझ्या मैत्रीत मी खुप खेळलो...
येतो मी त्या आठ्वनित कधी कधी जाऊँन,
असे वाटे की मी किती सुखात राहिलो...

मैत्रीचे मी मजबूत धागे बांधून,
विश्वासाचे एक गोड बंधन ठेवलो...
एक गोष्ट बोलू का मी ही संधी साधून,
तू नसताना देखिल मी तुला स्वप्नात पाहिलो...

अरे खरच नाही झाले माझे बोलून,
भीतीमूले मी प्रत्येक गोष्ट नाही बोललो...
काही गोष्टी केल्या मी तुझ्यापासून लपून-चपुन,
तुझे डोळे माला शोधत असताना मी लपलो...

जातो मी काही गोष्टी तुझ्याकडून मांगूंन,
पुन्हा तुलाच मी मांगतो...
जातो मी एक गोष्ट सांगुन,
की मी हे अगदी मनापासून सांगतो...

काही गोष्टी केल्या असेन मी चुकून,
पण मी माफ़ी मांगन्यात कधीच नाही चुकलो...
तू पण बसतेस कधी कधी अती रुसून...
मी देखिल कधी विनाकारण रुसलो...

तुझ्या प्रेमळ स्वभावात स्वतहाला हरवून,
मी तर फ़क्त तुला जिंकलो...
तुज्या अस्तित्वाला असे जिकून,
मी तुझ्या पुढे आनंदाने हरलो..

जाता जाता काही पावल थाम्बुन,
असे वाटे की मी तुझ्या जगात पुन्हा थाम्बतो...
मैत्रीचे एक प्रेमळ गीत गाउन...
मी त्या गोड आठवनिचे गीत गातो,

तुझ्या पासून अता खुप खुप लांब जाऊँन,
मी एकटाच एका कोपर्यात जाऊँन बसलो...
तुला माझ्यापासून दूर जाताना पाहून,
मी माझ्या ह्या नशिबावर हसलो ..

Post a Comment Blogger

 
Top